माणकोली गांवच्या उपसरपंच पदी सुनिल केणी यांची बिनविरोध निवड 


भिवंडी: तालुक्यातील गोदाम पट्टामध्ये नावारुपाला आलेली माणकोली ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणुक बिनविरोध पार पडली.सरपंच हर्षदा अरविंद माळी यांच्या अध्यक्षतेखाली सुनिल केणी यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच निवडीमध्ये मा.सरपंच सुनिल‌ माळी,मा.सरपंच कल्पना भोईर,मा.उपसरपंच चंदु माळी समवेत इतर सदस्यांनी सहभाग घेतला.


यावेळी दयानंद माळी,प्रभाकर म्हात्रे,करसन केणी,रविकांत पाटील,गुरूनाथ माळी,अरविंद माळी,रुपचंद ब.माळी,सुंदर माळी,चंद्रकांत केणी इत्यादीनी उपस्थित राहुन उपसरपंच सुनिल केणी यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.नवनिर्वाचित उपसरपंच सुनिल केणी यांनी सर्व मतदार बंधु भगिनी व ग्रामपंचायत कमिटीचे आभार मानत गावाच्या विकासासाठी जोमाने कार्य करु तसेच गावातील पाणी,आरोग्य,रोड रस्ते गटार या सर्व मुलभुत सुविधा ग्रामस्थांना पुरविण्यात आम्ही कटीबध्द राहु असे मनोगत देखील व्यक्त केले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...