भिवंडी शहर काँग्रेस प्रभारी अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्याविरोधात नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


भिवंडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष पदावर तब्बल नऊ वर्षांपासून कार्यरत असलेले शोऐब गुड्डू यांची शहर जिल्हा अध्यक्ष पदावरून अचानक उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार ऍड. रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती केली आहे.मात्र काँग्रेसच्या या अंतर्गत कारवाईने शहर काँग्रेस वर्तुळात मोठी खळबळ माजली असून त्याचे तीव्र पडसाद म्हणून भिवंडी शहर  महानगरपालिकेच्या कॉग्रेस नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी रशीद ताहीर मोमीन यांच्या प्रभारी अध्यक्षपदाच्या नियुक्तीस कडाडून विरोध केला असून त्याविरोधात बंड पुकारले आहे.


भिवंडी महानगरपालिकेत सध्या काँग्रेसचे ४७ नगरसेवक असून त्यापैकी १८ नगरसेवकांनी डिसेंबर २०१९ मधील महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरोधात मतदान करून बंडखोरी केली होती .त्यानंतर प्रदेश काँग्रेसने भिवंडी शहरातील या घटनेची गांभीर्याने दखल घेवून शोऐब गुड्डू यांची पदावरून उचल बांगडी केल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र शोऐब गुड्डू यांची २०१२ मध्ये शहर काँग्रेस पदावर नियुक्ती केल्यापासून महानगरपालिका सभागृहात काँग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस मजबूत करण्यात सिंहाचा वाटा असून त्यांना पदावरून दूर करताना रशीद ताहीर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून केलेली नेमणूक ही चुकीची असल्याचा आरोप नगरसेविका फरजाना इस्माईल रंगरेज यांनी केला असून काँग्रेस प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्ती विरोधात बंड पुकारीत काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजीनामा  प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्याकडे सादर केला आहे.


२०१९ च्या मोदी लाटेत झालेल्या पालिका निवडणुकीत ९० नगर सेवकांपैकी ४७ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आणून राजकीय निरीक्षकांन आच्छर्य चकित करण्याची किमया शोऐब गुड्डू यांनी करून दाखवली आहे. त्यामुळे त्यांना अचानकपणे शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे काँग्रेस गोटातून बोलले जात आहे. त्यामुळे रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्ती विरोधात काँग्रेस नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून त्यांनी नेहमीच काँग्रेस विरोधात भूमिका घेवून काँग्रेस  पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाची शहरात वाढ न होता अधोगती होणार आहे. तर दोन वर्षांनंतर महानगरपालिका निवडणूक होणार आहे.त्यावेळेस काँग्रेस पक्षाला याची किंमत मोजावी लागणार आहे.


हि वेळ काँग्रेसवर येऊ नये यासाठी प्रदेश काँग्रेस पक्षाने प्रभारी अध्यक्ष पदावरनियुक्त केलेले रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्तीचा फेरविचार करावा अन्यथा पालिकेतील सर्वच नगरसेवक काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी केली असून २९ काँग्रेस नागरसेवकांपैकी २१ नगरसेवकांनी आपल्या राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केल्या आहेत अशी माहिती पत्रकारांशी बोलताना स्थायी समिती सभापती व पालिका काँग्रेस गटनेता हालीम अन्सारी यांनी
 दिली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...