माथेरानच्या मिनीट्रेनची शटल सेवा अद्याप प्रतीक्षेत 


लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर टप्या टप्याने देशभरातील रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत मात्र माथेरानच्या मिनीट्रेनची शटल सेवा अद्याप सुरू झाली नाही सप्टेंबर महिन्यात ई पास ची अट हटविण्यात आल्यानंतर पर्यटकांचा ओघ माथेरानला हळूहळू सुरू झाला मात्र रेल्वेची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा अद्याप सुरू न झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना दस्तुरी नाक्यापासून गावात येण्यासाठी आपल्या सामानासह प्रवास करताना अत्यंत गैरसोयीचे होत असल्याने अपेक्षे प्रमाणे पर्यटक माथेरानला येत नाहीत त्यामुळे व्यवसायाला गती प्राप्त होत नाही. हॉटेल मालक, लॉजिंग , घोडेवाले, रिक्षा वाले,दुकानदार यांसह श्रमिक वर्ग सुद्धा चिंतेत दिसत आहेत. 


 काही दिवसांपूर्वी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मध्य रेल्वेचे डी.आर.एम. (व्यवस्थापक)यांची भेट घेऊन शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती तसेच महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव अभय यावळकर यांनी तात्काळ शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती मात्र रेल्वेने याबाबत अद्यापही तात्काळ अंमलबजावणी केलेली  नाही.लॉक डाऊनच्या दरम्यान देशभरातील गाड्या बंद असताना देखील सनियंत्रण समितीने आदेश देताच मालवाहतूकीची गाडी सुरू करण्यात आली होती विशेष म्हणजे मालवाहतूक गाडीची मागणी नसताना देखील ती सुरू करण्यात आली होती. 


येणारे पर्यटक हे खऱ्या अर्थाने नेरळ ते माथेरान ह्या मिनिट्रेन प्रवासाच्या औत्सुक्याने येत असतात. हा मार्ग सुध्दा उत्तम प्रकारे दुरुस्त करण्यात आलेला असताना केवळ रेल्वेच्या अधिकारी वर्गाची मानसिकता नसल्याने नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. निदान चार फेऱ्या नेरळ माथेरान दरम्यान असाव्यात जेणेकरून इथे पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येईल याच माध्यमातून रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात सुध्दा निश्चित पणे वाढ होणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मिनिट्रेन सेवा लवकरच सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला देण्याची मागणी व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष दीपक शाह यांनी केली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...