रोहित गुलाब भोईर यांच्यावतीने शासन कृत योजना शिबिर


डोंबिवली :  आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन कृत आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्ड चे वाटप निळ्जे पाडा घेसर येथे आयोजित करण्यात आले होते. आयुष्मान भारत जन आरोग्य योजना मध्ये दहा लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने मध्ये पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत करून देण्याचा संकल्प आयोजक तथा मनसे विभाग अध्यक्ष रोहित गुलाब भोईर आणि मनसे शाखा अध्यक्ष साईनाथ वामन भोईर यांनी केला आहे.


कारोना काळामध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सोशल डिस्टंसिंग चा वापर करीत योजना कार्डचे वाटप करण्यात आले. या योजनेचा गावातील सर्व नागरिकांनी लाभ घेतला. आमच्या गावातील रुग्णांची पैशाअभावी हेळसांड होऊ नये. पैशाअभावी आमच्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत अशी स्पष्टोक्ती रोहित उर्फ रोहिदास गुलाब भोईर यांनी केली. 


यावेळी उपशाखा अध्यक्ष नितेश सखाराम भोईर, संजय गुलाब भोईर, आदित्य हेमंत भोईर, आदेश कैलास भोईर , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गजानन पाटील, नगरसेवक प्रभाकर जाधव , समाजसेवक हेमंत भोईर ,माजी सरपंच राम पान्हेर कर, काशिनाथ पाटील, उद्योजक बाळू शेठ भोईर, एडवोकेट शशिकांत पाटील , सुरेश पान्हेरकर , आचल पाटील आदी पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...