मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या व्हॉईस चेअरमन पदी सुरेखा फनाडे


 मुरबाड :मुरबाडमधील तालुका शेतकरी सहकारी संघाच्या व्हॉईस चेअरमन पदी काँग्रेस पक्षाच्या सुरेखा अशोक फनाडे यांची आज बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.  यापूर्वीचे व्हॉईस चेअरमन जगन्नाथ घुडे यांचा कालावधी संपल्याने त्यांनी  राजीनामा दिला. 


 चेअरमन जगन्नाथ घुडे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.  माजी आमदार गोटिरामभाऊ पवार यांनी संचालकांना दिलेल्या सल्ल्यानुसार ही निवड करण्यात आली सुरेखा फनाडे यांची निवड झाल्या बद्दल मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल देसले ,  चेअरमन प्रकाश पवार , माजी चेअरमन रामभाऊ दळवी आदिंसह विविध कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...