परतीच्या पावसाने भातशेती चे नुकसान ; पंचनामे सुरू , मदतीच्या आपेक्षेत शेतकरी.


खालापूर: परतीच्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे , खालापूर तालुक्यातील अनेक महसूल गावे परतीच्या पावसाने नुकसान ग्रस्त झाली आहेत.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने , हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला आहे. तहसीलदार साहेब यांनी शेतीचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला दिले असून त्या बाबत सविस्तर पंचनामे तालुक्यात सुरू आहे.


याआधी निसर्ग चक्री वादळाने तालुक्यात  नुकसान झाले होते , त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वेळेवर मिळाली , त्याचप्रमाणे ही नुकसान भरपाई सुध्दा मिळावी ही मागणी शेतकरी बांधव करत आहेत. तरी सुद्धा सरकार कधी योग्य ती मदत करेल ह्याच कारणे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...