खर्डीत बसथांबा उपहारगृहाचा वापर नसल्याने दुरावस्था; गरदुले-दारुडयाचा झालाय अड्डा..
मूबंई-आग्रा महामार्गावरील खर्डी नाक्यावर एस.टी.महामंडळाची सवा एकर जमीन असून त्यावर गेल्या २५ वर्षीपूर्वी उपहारगृह व बस थांबा सुरु करण्यात आला होता परंतु गेल्या ४ वर्षापासून येथील बसथांबा व उपहारगृह परिवहन विभागाने बंद केल्याने, बाहेर गावावरून येणाऱ्या-जाणारया बस सद्या येथे थांबत नाहीत त्यामुळे येथील प्रवाश्याना जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे.परिवहन विभागाने येथे व्यापारी संकुल किवा पेट्रोल पंप सुरु करावा जेणें करून येथील स्थानिक बेरोजगार तरुणाना रोजगार उपलब्ध होऊन बसही थाबतील त्यामुळे स्थानिक प्रवाश्याना प्रवास करणे सूखकर होईल.
मूबंई-आग्रा महामार्गालगत खडीं नाक्यावर एसटी महामंडळाने दहा वर्ष बंद असलेले एसटीचे उपहारगृह गेल्या चार वर्षापूर्वी ठेकेदारामार्फत नुतनीकरण करून सूरू करण्यात आले होते.त्यावेळी येथे बाहेर गावावरून येणारया-जाणारया १०८ बस येथे थांबतील असे पत्र संबंधीत ठेकेदाराला एसटी महामंडळाने दिले होते.या बसथाब्यामूळे खडीं परीसरातील प्रवाशाना बाहेरगावी येण्या-जाण्याची सोय होणार होती.परंतु येथे सध्या एकही बस थांबत नसल्याने प्रवाशाना ट्रक सारख्या खाजगी वाहनांमधुन जीव धोकयात घालुन प्रवास करावा लागत आहे. बाहेर गावावरून येणारया-जाणारया बसेस खडीं पासून तीन कि.मी.वरील असलेल्या धाबयावर थांबत असल्याने प्रवाशाना रात्री येथून अंधारात पायी चालत यावे लागत आहे.त्यामुळे येथे एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
परीवहन अधिकारयांच्या हलगर्जीपणामुळे खडींतील बस थांबा ओस पडला असुन येथुन ३-४ किमी अंतरावरील खाजगी धाब्यावर बस थांबत आहेत.खर्डीतील १ हेक्टर ४८ गूंठे जमीन स्टेट ट्रांसपोर्ट एस टी महामंडळ च्या नावाने सातबारा आहे.सद्या या जागेवर एस टी महामंडळाच्या मालकीचे दुरावस्था झालेले उपहारगृह आहे.दरवाजे -खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असून सताड उघडे असलेले ह्या उपहारगृहात दारुडे, गरदुले व भिकारी यांचे वास्तव्य असून येथे एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.त्यामुळे परिवहन विभागाने मुंबई-आग्रा महामार्गालगत मुंबई कड़े जाणाऱ्या दिशेच्या लगत असणाऱ्या या जागेचा सदुपयोग करून येथे व्यापारी संकुल व पेट्रोल पंप सुरु करण्याची गरज आहे.