समतानगर येथे अशोका विजयादशमी व ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
पडघा : रक्ताचा एक थेंबही न सांडता ‘न भूतो ना भविष्यती’ अशी अद्भुत धम्मक्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये घडवून आणली. या कार्याला उजाळा देण्यासाठी अशोका विजयादशमी व ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन रविवार २५ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता भिवंडी तालुक्यातील समतानगर,पडघा येथील बुद्ध विहारात समाज विकास मंडळ , समतानगर व युवकांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.कोरोनाच्या संकटामुळे कमी संख्येत हा कार्यक्रम घेण्यात आला. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर मेणबत्ती प्रज्वलीत करून वंदन करण्यात आले. यावेळी युवा कवी,पत्रकार मिलिंद जाधव, कमलेश जाधव, भूषण दोंदे, हेमंत दोंदे, गितेश जाधव, मोनेश जाधव, संदेश जाधव उपस्थित होते.