मुरबाड शहरात होणाऱ्या चोऱ्या कमी करण्यासाठी व  महिला सुरक्षिततेसाठी तात्काळ सीसी. टीव्ही कॅमेरे बसवावेत... 

 मनसे विद्यार्थीसेना शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांची मुरबाड नगरपंचायतीकडे मागणी



 मुरबाड : सध्या कोरोनाच्या कालावधीत मुरबाड शहरात व बाजारपेठेत चोऱ्यांचे  सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.  दिवसेंदिवस मुरबाड बाजारपेठेत चोरांनी मोठ्या प्रमाणात  धुमाकूळ व धुडगूस घातला आहे. या चोरांना पकडण्यात मात्र मुरबाड  पोलिसांना अपयश येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत- कमी गर्दी करून मुरबाड शहरवासियांनी  कोरोनावर नियंत्रण आणले असले तरी 'चोऱ्या' नावाचा कोरोना आता मुरबाडकरांच्या  मानगुटीवर येऊन बसला आहे. 


रात्रीच्या  कमी गर्दीचा फायदा घेऊन  काही भुरटे व मस्तवाल चोर रात्रीच्या वेळी राजरोसपणे  दुकाने  फोडून चोऱ्या करत आहेत. त्यामुळे अनेक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  ही समस्या तात्काळ सोडविण्यासाठी मनसे विद्यार्थीसेनेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव  यांनी नुकतच मुरबाड  नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी  कंकाळ यांना निवेदन देऊन मुरबाड शहरात   होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र कमी करण्यासाठी  तात्काळ सीसी. टीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली आहे


 हे निवेदन देताना मनसे विद्यार्थीसेना उपशहरअध्यक्ष अजीम मनियार,मुरबाड महिला शहर अध्यक्षा वैशाली गोंधळी, प्रभाग क्रमांक १५ चे शाखा अध्यक्ष  ऋषिकेश तेलवणे, प्रभाग क्रमांक १६ चे शाखा अध्यक्ष उमेश सोनावणे, प्रभाग क्रमांक १६ चे शाखा उपाध्यक्ष सुनील बल्लाळ, प्रभाग क्रमांक १३ चे शाखा अध्यक्ष  विकास गुप्ता आदी  यावेळी उपस्थित होते. याअगोदर देवेंद्र जाधव यांनी मुरबाड पोलीस स्टेशनलाही याबाबतचे पत्र दिले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...