पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पदी विशाल बाफना यांची नियुक्ती 


 पेण: पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी उद्योजक विशाल बाफना यांची नियुक्ती खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. 


खासदार सुनील तटकरे यांनी मोठ्या विश्वासाने पेण शहर राष्ट्रवादी उपाध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवली आहे. तो विश्वास सार्थ ठरवून पेण शहराबरोबरच पेण विधानसभा मतदार संघात पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास विशाल महेंद्र बाफना यांनी या वेळी व्यक्त केला.


 यावेळी  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत, उदय जवके, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे,पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, नगरसेविका वसुधा पाटील, नगरसेवक राजेंद्र वारकर, मंगेश पेडामकर,सागर हजारे, हबीब खोत, आनंद जाधव, भूषण कडू ,जैन नाईक, सुचिता चव्हाण, कृष्णा भोईर, प्रसन्ना पोटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...