युवती व महिलांसाठी आयोजित नवरात्री स्पर्धा २०२० चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
ठाणे :भाजपा ठाणे शहर जिल्हा द्वारे आयोजित केलेल्या युवती व महिलांसाठी नवरात्री स्पर्धा २०२० चा पारितोषिक वितरण समारंभ आज सकाळी खोपट ऑफिस, ठाणे येथे आमदार ॲड. निरंजनजी डावखरे, अध्यक्ष, ठाणे भाजपा शहर आणि प्रदेश सचिव ॲड. संदीपजी लेले,उपाध्यक्ष सचिन मोरे,नगरसेविका मृणाल पेंडसे,नगरसेविका दीपा गावंड,कैलास जी म्हात्रे (सरचिटणीस ठाणे शहर) स्वप्नली साळवी, मत्स्यगंधा पवार, स्नेहा शिंदे, विद्या कदम, इंदिरा पटेल, सारंग मेढेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यामध्ये नवरात्री सजावट (देवीचा मखर/ आरास) स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, देवीला साकडे लेखन स्पर्धा, सामाजिक विषयांवर पोस्टर मेकिंग इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. युवती आणि महिलांसाठी असलेल्या या कल्पक स्पर्धेस तसेच पारितोषिक वितरण समारंभास अत्यंत उत्तम प्रतिसाद लाभला. याप्रसंगी नागरिक, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.