शिवळे येथे ग्राहक मेळावा संपन्न. 



सरळगांव: 
विद्यूत मंडळाच्या वतीने आयोजित केलेला ग्राहक मेळावा शिवळे येथे  संपन्न झाला. प्रलंबित कामे आठ दिवसांत पुर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले . विद्यूत ग्राहकांच्या अडीअडचणी गावात जाऊन समजून  घेऊन त्या अडीअडचणी तातडीने सोडवता याव्यात त्या साठी आज शिवळे येथील शिवमंदीराच्या प्रांगणात ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. वाढीव विद्यूत बील येणे हे नित्याचे झाल्याने या ग्राहक मेळाव्याला विद्यूत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.


या मेळाव्यात वाढीव बील, जूने व जिर्ण झालेले विद्यूत पोल, बंद व फॉल्टी मिटर ,वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा या विषयांवर गर्मा गर्म  चर्चा झाली. या वेळी मुरबाड कार्यालयाचे अधिकारी सुरेश सुराडकर , सरळगाव विभागाचे अधिकारी राजेंद्र  शिर्के, मनिष पाटील, शिवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रेखा ईसामे,माजी सरपंच मनोहर ईसामे, महेश बांगर, लक्ष्मण खोंळबे, दिपक गायकवाड,धनाजी दळवी सर, कृष्णा ईसामे ,  व मोठ्या संख्येने ग्राहक व विद्यूत कर्मचारी  उपस्थीत होते. लॉकडाऊन मुळे विद्यूत मिटरचे पैसे भरूनही मिटर देता आले नाही तर या ग्राहकांना या ठिकाणी मिटरचे वाटप करण्यात आले.


गावातील विद्यूत तारा,जिर्ण झालेले  पोल,या प्रलंबीत कामे आठ दिवसांच्या आत पुर्ण करण्याचे आश्वासन या मेळाव्यात देण्यात आले,चूकिची आलेली लाईट बील याच ठिकाणी दुरूस्त करून देण्यात आल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. विद्यूत पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो तातडीने सुरू करता यावा या साठी कर्मचा-यांनी सतर्क  राहावे असी समजही कर्मचारी वर्गास या वेळी देण्यात आली. गावातील होल्टेज बरोबर राहाण्यासाठी नवीन टान्सफार्मर फसविण्याचा ठरावही या वेळी घेण्यात आला. 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...