मुरबाड नगरपंचायतचे कचरा व्यवस्थापन वनविभागाच्या जागेत... 



मुरबाड :नगरपंचायत नागरिकांना ओला सुका कचरा घंटगाडीत वेगळा टाकण्याचे आवाहान नागरिकांना करते मात्र नगरपंचायत तोच कचरा एकत्र वनविभागाच्या खरब्याची वाडी येथिल  जागेत टाकुन मुरबाडकरांना गंडवत आहे. त्या कचऱ्या मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचाही मोठया प्रमाणात समावेश आहे.विशेष बाब म्हणजे तिथे कचऱ्यामुळे  जनावरांचाही वावर वाढला आहे.


 हा प्लास्टीक मिश्रीत कचरा  खाल्यामुळे  त्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे.आता या सर्वाना जबाबदार कोण,स्वच्छते मध्ये क्रमांक प्राप्त करणारी मुरबाड नगरपंचायत की, इतर वेळी आपल्या जागे बाबत दक्ष असणारी  मात्र यावेळी गप्प असणारे वनविभाग  असा प्रश्न मुरबाडकर विचारत आहेत .


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...