भिवंडीतील प्रसिध्द डॉ.शिरीष ताम्हाणे यांचे दुःखद निधन


भिवंडी:  शहरातील कणेरी परिसरात राहणारे डॉ.शिरीष यशवंत ताम्हाणे (७३)यांचे अल्पशः आजाराने ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी दुःखद निधन झालेआहे.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.



डॉ. ताम्हाणे हे नामांकित सर्जन म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी वैद्यकीय सेवा करीत होते.येथील कुंभारवाडा येथे त्यांचे हॉस्पिटल होते तसेच अनेक वर्ष त्यांनी आफ्रिकेमध्ये सुद्धा वैद्यकीय सेवा बजावली होती.गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते त्यांच्यावर ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र सकाळी त्यांच्यावर उपचार सुरू असताना निधन झाले त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ठाणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...