भाजपा चे अशोक मिरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा भाजप मच्छीमार सेल अशोक मिरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार कपिल पाटील व आमदार रमेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.गोदरेज हील बारावे गाव परिसरात असणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्याच्या उद्देशाने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे अशी स्पष्टोक्ती मिरकुटे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी पक्ष आणखी बळकट भावा आणि जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये भाजपाचे वर्चस्व कसे प्रस्थापित होईल यावर पूर्ण कोपरी आम्ही मेहनत करणार आहोत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये रस्ते शौचालय तसेच स्मशानभूमीचा प्रश्न उद्भवत आहेत आणि जास्तीत जास्त टॅक्स आमच्या प्रभाग मधून कल्याण डोंबिवली महापालिकेला जातो त्याच प्रभागामध्ये दुरावस्था दिसून येत आहे ती आम्ही योग्य तोपरी मार्गी लावू असे मिरकुटे उद्घाटन वेळी म्हणाले.यावेळी शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे , नगरसेवक अर्जुन भोईर ,नगरसेवक वरून पाटील अर्जुन महत्रे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.