घोटासई येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे बिल्डराच्या माती उत्खननात नुकसान
टिटवाळा: तालुक्यातील घोटासई येथील शेतकऱ्यांची भात शेती बिल्डरांच्या अनधिकृत माती उत्खननात उध्वस्त झाली आहे, याबाबत शेतकरी वसंत पवार यांनी संबंधित बिल्डरला वारंवार सांगून ही या बिल्डर ने भात शेतीची माती केली आहे.टिटवाळा गोवेली रस्त्याच्या बाजूला पद्मावती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स याने बिल्डरने टोलेजंग इमारती ची कामे सुरू केली आहेत, या बिल्डर च्या जमिनी लगत वसंत पवार यांची वडिलोपार्जित भात शेती आहे.
याच भात शेतीवर पवार कुटूंबाची गुजराण सुरू आहे. मात्र टिटवाळया नजीक इमारतीची सुरू असलेली बांधकामे येथील शेतीचा घोट घेत आहेत,त्याचा प्रत्यय वसंत पवार याना आला असून यावर्षी त्यांनी भात लागवड केलेली ५० गुंठे जमीन कापणी न करताच तशी च शेतात सोडली आहे,बिल्डरने त्याच्या शेतीत सांडपाणी व इतर पाणी सोडले आहे,त्यामुळे संपुर्ण शेत पाण्याने भरले आहे, ते कापायचे कसे या विवंचनेत पवार कुटूंब असून त्यांनी याबाबत तहसीलदार, कल्याण डोंबिवली महापालिका, टिटवाळा पोलिसांकडे तक्रार केली आहे, मात्र धन दांडग्या बिल्डर वर कारवाई कधी होणार याची प्रतीक्षा वसंत पवार यांना आहे,