कोंशीबी सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी अरुण गोरले यांची बिनविरोध निवड
पडघा: भिंवडी तालुक्यातील नऊ गावामध्ये विस्तार असलेल्या व ७५१ सभासद संख्या असलेल्या कोशिंबी गृप विवीध कार्यकारी शेतकरी सेवा सहकारी सोसायटीचे सभापतीपदी राहुर येथील अरुण गोरले यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
मावळते सभापती मनोहर ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते त्यानुसार निवडणुक निर्णय अधीकारी रंजना वळवी यांच्या अध्यक्षतेखाली पडघा येथील संस्थेच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभापती पदासाठी अरुण गोरले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापती निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी संचालक विष्णु पाटील, लक्ष्मण गोष्टे, बबन पाटील, गुरूनाथ फाफे, भगवान ठाकरे, मनोहर ठाकरे, सुनील ठाकरे, शंकर ठाकरे, विणा पाटील, किशोरी मुसळे, दत्तात्रय शिंदे, सचीव आदेश जाधव, उपस्थीत होते. तर त्यांची निवड होताच शिवसेना संपर्क प्रमुख विष्णु चंदे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य माजी सभापती व विद्यमान सदस्य वैशाली चंदे, संतोष जाधव आमणेपाडा, संतोष फाफे, हरीश्चंद्र बरफ, अनील सुरुम, रोशनी शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले.