आदिवासी कुटूंबाना तात्काळ खावटी अनुदान योजनेचे लाभ द्या
कसारा : राज्य शासनाने खावटी अनुदान योजना मंजूर केल्याची घोषणा करून दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे .अद्याप पर्यत खावटी योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यामुळे आदिवासीना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय कोरोनाचे संकट असतानाच अवकाळी पावसाने शेतीची मोठं नुकसान झाले आहे
यामुळे आदिवासी शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यातच जव्हार मोखाडयात कुपोषण भूकबळी ही ह्या समस्या भयंकर असून कुपोषनाने डोकं वर काढल आहे. यामुळे सरकारने गंभीरतेने दखल घेऊन खावटी अनुदान योजनेचीसाठी कोणत्याही अटी शर्ती न ठेवतात आदिवासींना सरसकट लाभ घ्यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.आदिवासी कुटूंबाना तात्काळ खावटी अनुदान योजनेचे लाभ द्या