कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहनची पनवेल आणि वाशी बससेवा सुरु


 कल्याण : लॉकडाऊनमुळे बंद झालेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहनची पनवेल आणि वाशी बससेवा सुरु करण्यासाठी मनसेने परिवहन व्यवस्थापकांकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर पनवेल आणि वाशी बससेवा सुरु झाली असून हि बससेवा सुरु केल्याबद्दल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर आणि विभाग अध्यक्ष काजीम शेख यांनी परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांचे आभारपत्र देऊन आभार मानले आहे.   


लोकल सेवा बंद असल्याने नोकरदार वर्गाचे हाल होत होते. यासाठी मनसेने पनवेल आणि वाशी मार्गावर बस सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार यामार्गावर बस सुरु झाल्याबद्दल मनसेने परिवहन व्यवस्थापकांचे आभार मानत या मार्गांवर ज्यादा बस सोडण्याची मागणी केली आहे. तर या मार्गावरील बससंख्या वाढविण्याचे आश्वासन परिवहन व्यवस्थापकांनी दिले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...