खर्डीत ईद ए मिलाद व कोजागिरीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न


 


खर्डी: मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद व कोजागिरीच्या पार्श्वभूमीवर खर्डी विभागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापुरचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डी पोलीस दुरक्षेत्रा च्या प्रांगणात शांतता कमिटीची सभा घेण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात शासकीय नियम पाळून सण साजरे करा, मिरवणूक काढू नये,प्रवचन ऑनलाइन दाखवा,समाजात कोणाच्याही भावना भडकणार असे मेसेज सोशियल मिडियावर वायरल करू नये याची काळजी घ्या,कोणताही संशयित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसाशी संपर्क करा,कुठेही वाद होणार नाही याची काळजी घ्या 


सोशल मिडिया वरील भावना भड़कवीणारे मेसेज व्हायरल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी विशेष यंत्रणा स्थापन करण्यात आली असून अश्या व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी समाजसेवक पप्पू मिस्रा,मुस्लिम ट्रष्टचे शाकिर शेख,फारूक मेमन,सय्यद,मलिक शेख,अय्याज कोतवाल,पोलीस अंमलदार अंबर कांबळे,एन,दहावड यांच्यासाहित अनेक मान्यवर उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...