उल्हासनगरात महाविकास आघाडीतील शिवसेनेची आश्वासनपूर्ती.. 


उल्हासनगर: ओमी कालानी,काँग्रेस,राष्ट्रवादी,रिपाइं आठवले व पिआरपी ला सोबत घेऊन शिवसेनेने उल्हासनगर महानगरपालिकेत महाविकास आघाडी तयार करून अवघ्या अडीच वर्षात भाजपला सत्तेतून पायउतार केले होते.तेंव्हा दिलेल्या आश्वासना नुसार राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांना सभागृहनेते व काँग्रेसच्या अंजली साळवे यांना प्रभाग सभापती पद देऊन शिवसेनेच्या वतीने आश्वासनाची पूर्तता करण्यात आली आहे.


अंजली साळवे यांचा निवडून येण्याचा दुसरा टर्म असून त्यांना प्रभाग समिती ४ च्या सभापती पदाची उमेदवारी देण्यात आली होती.त्यात त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.भारत गंगोत्री हे स्थायी समिती सदस्य असून त्यांना प्रतिष्ठित असे  सभागृहनेते पद देण्यात आले आहे.यापूर्वी या पदावर राजेंद्र चौधरी होते.राज्य पातळीवर व उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी असून तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहेत.शिवसेना हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष असून त्यामुळे प्रथमच महत्वाच्या पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली अशी प्रतिक्रिया भारत गंगोत्री,अंजली साळवे यांनी व्यक्त केली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...