भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने ४० कोटींच्या रस्त्यांची कामे मंजूर
भिवंडी: भाजपाचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे ४० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २३ रस्त्यांची कामे मंजूर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यात आली होती.२०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या सर्व कामांची निविदा प्रक्रिया आठवडाभरात सुरू होणार असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होऊन पावसाळ्याआधी ग्रामस्थांना चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करता येणार आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी खासदार कपिल पाटील यांनी २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.त्याचबरोबर तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.खासदार कपिल पाटील यांची २३ रस्त्यांची मागणी शासनाने मान्य केल्यामुळे आता ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघा बायपास रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लाख, राज्य मार्ग ८१ (देवळी) ते हरीपाडा रस्त्यासाठी १ कोटी ७३ लाख, राज्य मार्ग ८२ (कासणे) ते खैरपाडा रस्त्यासाठी २ कोटी ३७ लाख, राज्य मार्ग ८४ निंबवली कशिवली (धामणगाव) रस्त्यासाठी १ कोटी २८ लाख, इतर जिल्हा मार्ग १२९ ते ठाकराचा पाडा रस्त्यासाठी १ कोटी १८ लाख, सुरई ते भरोडी रस्त्यासाठी ८२ लाख, कल्याण तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ६९ उतणे चिंचवली रस्त्यासाठी ३ कोटी ४० लाख, खडवली वावेघर ठाकूरपाडा रस्त्यासाठी १ कोटी ६३ लाख, टिटवाळा म्हस्कळ रस्त्यासाठी १ कोटी ८९ लाख, गेरसे ते कोसले रस्त्यासाठी १ कोटी ६ लाख, शहापूर तालुक्यातील कोंशिबडे पिवळी खोर रस्त्यासाठी ३ कोटी ४३ लाख, अंबर्जे घोसई मढ रस्त्यासाठी २ कोटी ७५ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ६२ ते कातकरीवाडी रस्त्यासाठी २ कोटी ७३ लाख, बाभळे जोड रस्त्यासाठी ९३ लाख, भावसे ते टहारपूर रस्त्यासाठी ९० लाख, राज्य मार्ग ७९ ते आखाड्याचा पाडा रस्त्यासाठी ४६ लाख, राज्य मार्ग ७८ ते टाकणे रस्त्यासाठी ६२ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ६२ ते खरीवलीपाडा रस्त्यासाठी ७४ लाख, किन्हवली ते शीळ रस्त्यासाठी ७७ लाख, मुरबाड तालुक्यातील राज्य महामार्ग २२२ ते धानिवली ब्राह्रणगाव ते शिरगाव रस्त्यांपर्यंत रस्त्यासाठी २ कोटी २८ लाख, बेलपाडा (मासले) संतवाडी रस्त्यासाठी ८२ लाख, उमरोली पेंढारवाडी सिद्धेश्वरवाडी रस्त्यासाठी १ कोटी ९९ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ७८ ते सोनावळे रस्त्यासाठी १ कोटी ९९ लाख रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.
** पडघावासियांना वाहतूककोंडीतून दिलासा
पडघा बाजारपेठेतून जाणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत आहे. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पडघा येथील बायपास रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यामुळे पडघावासियांची वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे.