पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती उत्साहात साजरी

इमेज
ठाणेः शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरूनानक जयंतीनिमित्त ठाण्यातील गुरूद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. इतर उत्सवांप्रमाणेच गुरूनानक जयंतीवरही कोरोनाचं सावट होतं. गुरूनानक साहेब यांचा जन्म कलवंडी इथे झाला. आता हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे. गुरूनानक जयंतीनिमित्त गुरूद्वारामध्ये गुरू ग्रंथ साहेबचं पठण तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून शीखांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या गुरू ग्रंथ साहेब या ग्रंथाचं अखंड वाचन केलं जात होतं. १४३० पानांच्या या ग्रंथात हिंदूंचे १३, शीखांचे ७ आणि मुस्लिम धर्मियांचे ५ अध्याय आहेत. संत रामदास स्वामी, संत नामदेव, संत कबीर या संतांच्या रचनांचा यात समावेश आहे.

कोनगांव पोलिसांकडून मोबाईल स्नॅचिंग करणारी टोळी  जेरबंद. 

इमेज
भिवंडी : तालुक्यातील रांजणोली नाका येथे एसटी बस अथवा प्रवासी वाहनांची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. महामार्गावर मोबाईल सँचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी आपल्या पोलीस पथकास या भागात विशेष गस्त लावून या चोरट्यांचा मागोवा काढण्याचे आदेश दिले असता सपोनि.नितीन सूर्यवंशी ,अभिजित पाटील ,सहाय्यक पो.उपनिरी सूर्यवंशी ,पो.हवा. नलावडे,किरण पाटील ,पो.ना. मासरे, कृष्णा महाले ,अविनाश पाटील, गणेश चोरघे,देवरे या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने रिजावन अब्दुल मातीनं अन्सारी (२० ) ,फिरोज सलाउद्दीन शेख (१९ ) या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल व एक दुचाकी असा ६५,९९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे .  भिवंडी शहर व विशेषतः महामार्गालगतच्या ग्रामीण भागात दुचाकीवरून मोबाईल हिसकवणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत.याबाबत विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून नुकताच भिवंडी गुन्हे शाखेने देखील मोबाई...

कोरोना-योद्धा हेच आहेत खरे सामाजिक आदर्श : कोश्यारी 

इमेज
ठाणेः ' कोरोना संकटाच्या बिकट परिस्थितीमध्ये माणसांना खरोखर मदतीची गरज होती, अशावेळी अपेक्षित असलेली अनेक सामर्थ्यवान लोकं स्वत:चा जीव सावरत आपापल्या घरात लपून बसली होती, पण अशा गंभीर व बिकट परिस्थितीतही काही समाजसेवी संघटनांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखुन आपले प्राण पणास लावून या संघटना गरिब-गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आणि सरकार व प्रशासनाचे खांद्याशी खांदा लावून सहकार्य केले. आपली सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे बजावणा-या ह्याच व्यक्ती कोरोना योद्धा असून ते खरे सामाजिक आदर्श आहेत ', असे प्रतिपादन इंटरनेशनल मारवाडी फेडरेशन (आयएमएफ) च्या वतीने राजभवनाच्या मलबार हिल्स बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोरोना वॉरियर्सच्या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी केले.  कोश्यारी व सुप्रसिद्ध विनोदी कवी-टिव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेते शैलेश लोढा यांची याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कोरोनाकाळात लोकसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारे परमार्थ सेवा समितीचे चेअरमन-उद्योगपती लक्ष्मीनारायण बियाणी, महाराष्ट्र पोलिस...

कंत्राटी कामगारांनी कोकाकोला कंपनीचे काम पाडले बंद;प्रवेशद्वारासमोर केले कुटुंबासह आंदोलन 

इमेज
वाडा: कोकाकोला कंपनीतील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने रद्द केला असुन या ठेकेदारांचे १३१ कामगार असून या कामगारांना दुस-या ठेक्यात टाकण्यात आले आहे.पहिल्या ठेकेदाराचा राजीनामा देऊन पुन्हा नव्याने दुस-या ठेकेदाराकडे काम करण्यास सुरुवात करावी असे कंपनीचे म्हणणे आहे तर पूर्वी केलेल्या कामाची सेवा खंडीत न करता नविन ठेकेदाराकडे काम करण्यास कामगार तयार आहेत. या वादामुळे कामगार व कंपनीचे एकमत होत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी आज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन सुरू करून कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे.या वादामुळे कंपनीत वातावरण तंग बनले आहे.   तालुक्यातील कुडूस या ग्रामपंचायतीच्या हद्दीत ' कोकाकोला ' ही शीतपेयांचे उत्पादन करणारी कंपनी आहे.या कंपनीत शेकडो कामगार काम करीत आहेत. कंपनीत कायमस्वरुपी कामगार वगळता ३३० कंत्राटी कामगार आहेत. कंपनीत एकूण चार ठेकेदार होते त्यातील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने १ नोव्हेंबर २०२० पासून रद्द केला आहे. रद्द केलेल्या दोन ठेकेदाराकडे १३१ कामगार आहेत. या कामगारांना उर्वरित दोन ठेकेदारांच्या ठेक्यात टाकण्यात आले आहे. मात्र कंपनीने कामगारांना पूर्...

ज्या क्षेत्राची आवड असेल तेच करियर निवडा- नवनाथ ढवळे (उपविभागीय पोलीसअधिकारी)

इमेज
शहापुर : आगामी होणाऱ्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर भानुदास भोईर व भास्कर भोईर यांच्या संकल्पनेतुन पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ  सोमवारी  शहापुरातील म.ना.बरोरा माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व तरुण, तरूणींना मार्गदर्शन करतांना  शहापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्याला ज्या क्षेत्राची आवड असेल तेच क्षेत्र  व करियर निवडावे.तसेच स्वतःशी प्रामाणिक राहून सकारात्मक दृष्टीकोन असावा.  अभ्यास करताना खचुन न जाता संयम व आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे सांगून स्पर्धा परीक्षेसाठी पाचवी ते बारावी पर्यतच्या पुस्तकांचा बेसिक अभ्यास महत्वाचा आहे. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांशी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सवांद साधला.  उपस्थित मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, रमेश वनारसे, ऍड.दिवाणे, अनिल निचिते आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना व तरुण, तरूणींना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तर प्राचार्य दत्तात्रय किरपण यांनी मा...

बस अपघातात मृत महिलेच्या कुटुंबास जिजाऊची मदत

इमेज
  वाडा: वंदना सजन लहागे (३२)उजैणी ता.वाडा या महिलेचा दि.२७रोजी  बस अपघातात पिक हातोबा येथे अपघाती मृत्यू झाला होता. सदर महिलेस तीन मुले असून तीनही मुले शिक्षण घेत आहेत.सदर ची घटना .निलेश भगवान सांबरे उपाध्यक्ष जि प पालघर तथा संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था  यांना समजतात सदर महिलेच्या कुटुंबास २५०००/- (पंचवीस हजार रुपये) आर्थिक मदत करण्यात आली.  सदरची आर्थिक मदत जि प सदस्य .शशिकांत पाटील, जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष जि प सदस्य .संदेश ढोणे  यांच्या हस्ते देण्यात आली.तसेच शासनाकडून मदतीसाठी अनिल परब  परिवहन मंत्री,  जिल्हाधिकारी पालघर व आगार व्यवस्थापक वाडा यांना संस्थेकडून पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच यापुढे सदर मृत महिलेच्या तीनही मुलांना शैक्षणिक मदत लागल्यास जिजाऊ संस्थेकडून सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

युवतींसाठी मोफत लाठीकाठी व आत्मसंरक्षण शिबीर संपन्न.. 

इमेज
 मुरबाड : दि.२७,२८,२९ नोव्हेंबर २०२० रोजी  महाराष्ट्र युवा संघ कल्याण संलग्न - नेहरू युवा केंद्र ठाणे, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ड्रॅगन इंडियन कराटे वेलफेअर असोसिएशन मुरबाड यांच्या संयोजनाने आणि  मुरबाड तालुका युवा व क्रीडा मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने शांताराम भाऊ घोलप सभागृह काँग्रेस भवन, बाजारपेठ  मुरबाड येथे यशस्वी रित्या संपन्न झाला. आज समाजातील  अनेक तरुणी  अन्याय  ,अत्याचाराला बळी पडत आहेत . त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करुन ,स्वसंरक्षण कसे करावे तसेच त्यांच्यात आत्मनिर्भयता निर्माण व्हावी हा या शिबिराचा उद्देश आहे. या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.  यावेळी ॲडव्होकेट मा. अशोक फनाडे - सचिव-शांताराम भाऊ घोलप सभागृह काँग्रेस भवन मुरबाड,मा.  लक्ष्मण घागस सर अध्यक्ष, ड्रॅगन इंडियन कराटे वेल्फेअर असोसिएशन मुरबाड,मा. सौ. शीतल तोंडलीकर माजी नगराध्यक्षा  मुरबाड नगरपंचायत, डॉ.स्वप्नील वाघचवडे -  वैद्यकीय अधिकारी ग्रामिण रुग्णालय मुरबाड , डॉ. सौ.स्नेहल वाघ...

 शेकडोंच्या संख्येने किन्नर होणार पदवीधर पदवी पर्यंत शिक्षण देण्यास सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा पुढाकार

इमेज
उल्हासनगर : शिक्षणाची इच्छा असूनही काही बंधने किंबहूना अडचणी असल्याने त्यापासुन वंचीत राहणाऱ्या उल्हासनगरातील शेकडो किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना पडवी पर्यंत शिक्षण देण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.चांदीबाई महाविद्यालयात किन्नरांचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ही घोषणा करण्यात आली.गेल्या काही वर्षांपासून किन्नर समुदायाला ओळखपत्रे बनविणे,बँकेत खाते उघडणे या पासून अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो.हि बाब लक्षात आल्यानंतर वाण्या फाउंडेशन ऑफ उल्हासनगर,किन्नर अस्मिता,इंडस एज्युकेशन या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात किन्नर समुदायाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे,स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे या विषयीची देखील चर्चा झाली.सिंधू एज्युकेशन सोसायटीने किन्नरांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे तर कोणार्क बँक व इतर बँकांनी देखील किन्नरांना बँक खाते उघडण्यास योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.रोज थोडे थोडे पैसे बचत करून बँकेत जमा करण्यासाठी डेली कलेक्शन करण्यात येईल त्यासाठी किन्नर स...

कल्याण ग्रामीण मध्ये खोणी येथे आगरी-कोळी, वारकरी भवन होणार - आमदार राजू पाटील.

इमेज
ठाण्याची मुळ बोली आगरी-कोळी भाषा आणि तिचे साहित्य जतन-संवर्धनात पुढाकार घेत असलेले युवा साहित्यिक सर्वेश तरे, भुमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील,चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील,गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसेचे एकमेव आमदार राजु पाटील यांना आगरी-कोळी बोलीला ‘राजाश्रय मिळावा यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र दिले.   या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी :  आगरी-कोळी बोली,संस्कृती जतना-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे. आगरी-कोळी बोलीतील साहित्य निर्मीतीला प्रोत्साहन व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातुन शिबीरे राबविणे. बोलीभाषा प्रसार-संवर्धनासाठी जिल्हास्थरीय संशोधन केंद्रे निर्माण करणे. नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आगरी-कोळी भाषा आणि तिचे दुर्मिळ साहित्य ‘ग्लोबल’ करणे. सोबतच महाराष्ट्र राज्यसरकारचे २०१४ चे भाषे विषय धोरण बोलीभाषेचे संवर्धन करणे. लोकगीत,लोककला,लोककथा संकलन-प्रसिध्द करणे.  मराठी भाषा समृद्द करण्यासाठी बोलींचे शब्दकोश तयार करणे. बोलीचा अभ्यास,संकलन आणि संशोधन करण्यासाठी यंत...

आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने धर्मवीर आनंद दिघेसाहेब उड्डाणपूल जनतेसाठी खुला

इमेज
कल्याण : राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून MMRDA अंतर्गत ४.३५ कोटी निधी मधून मंजुर करून घेतलेल्या कल्याण पूर्व व कल्याण पश्चिमला जोडणारा आई तिसाई देवी उड्डाण पुल (पत्रीपूल) नंतर दुसरा पर्यायी रस्ता असलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाणपूल ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वालधुनी, एफ कॅबिन रोड रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे आज लोकार्पण करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला.   धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाणपूलावर पडणाऱ्या खड्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी या पुलावर मास्टिक करण्याबाबत महानगपालिकेस पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता त्यानुसार या पुलावर मास्टिक करण्यात आले. या रस्त्यामुळे कल्याण पूर्व-पश्चिमेला येण्या जाण्यासाठी वाहन चालकांना होणाऱ्या त्रासातुन सुटका होणार आहे.  यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे,  महिला जिल्हा अध्यक्षा रेखा चौधरी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय, कल्याण...

मुरबाडचा बागेश्वरी सजणार; ब्रिटिशकालीन तलावाला पर्यटनाचा दर्जा .. 

इमेज
मुरबाड : शहराजवळ वन विभाग व मुरबाड नगर पंचायतीच्या वतीने एक पर्यटन स्थळ विकसित होत असून लोकांना जलक्रीडा करण्या बरोबरच उंच टेकडीवर शुद्ध हवेचा मुबलक पुरवठा करणाऱ्या ऑक्सीजन पार्क मध्ये मुक्त पणे विहार करण्याची संधी मिळणार आहे त्याच बरोबर गर्द झाडीत असलेल्या पुरातन बागेश्र्वरि मंदिरात देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळणारआहे केवळ मुरबाड शहर नव्हे तर कल्याण -मुंबईहून  तालुक्यात येणाऱ्या अनेक पर्यटकांचे ते आकर्षणाचे केंद्र  असणार आहे.  मुरबाड शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रिटिश कालीन बागेश्वरी तलाव व त्याशेजारी असलेली उंच टेकडीवर पर्यटन स्थळ विकसित होत आहे. त्यापैकी ऑक्सीजन पार्कचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्यासाठी आतापर्यंत १ कोटीच्या आसपास निधी खर्च झाला आहे. पुढील महिन्यात बागेश्र्वरी तलावात बोटींग सूरु होत असून ही संधी पर्यटकांटाना  मिळणार आहे. त्यासाठी तलावाचे खोलीकरण व सुशोभीकरण करणेसाठी मुरबाड नगर पंचायतीला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार किसन कथोरे यांनी या कामासाठी सातत्याने  पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.     ...

चांगल्या कामाचे मनसे नेहमी कौतुक करणार:- जिल्हा सचिव रुपेश पाटील

इमेज
  पेण : मुंबई गोवा महामार्गावरील हमरापूर फाट्याच्या खराब रस्त्याबाबत वारंवार चर्चा करून व निवेदन देऊन दुर्लक्ष केल्याने  मनसेचे  रुपेश पाटील हे आक्रमक झाले होते. लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी आणि डांबरीकरण करून देणार असा  शब्द ठेकेदारांनी दिला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील इरवाडी, हमरापुर फाटा नजीकच्या रस्त्याचे डांबरीकरण करून प्रवाशांना चांगला रस्ता तयार केल्यामुळे दिलेल्या शब्द पाळल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदार व कामगार यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच प्रशासनाचे पण आभार मानले.   रस्त्यावरील अवाजवी खड्डे आणि सतत उडणारी धूळ पाहता प्रवाशांना आणि वाहनधारकांना तसेच मोटारसायकल स्वार यांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत होते. मात्र मनसेतर्फे शेवटचा इशारा दिल्याने अखेर रस्त्यावर डांबरीकरण झाल्याने समाधान व्यक्त करत मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील म्हणाले की मनसे फक्त विरोधातच नसते तर जे चांगले आहे ते चांगले म्हणणार आणि चांगल्या कामाचा नेहमी कौतुकही करणार असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

वज्रेश्वरी रोडवर डंपर चालकाची चार वाहनांना धडक ; एकाचा मृत्यू

इमेज
 भिवंडी : तालुक्यातील वज्रेश्वरी - अंबाडी रोडवर सोमवारी सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद डंपर चालकाने भरधाव वेगाने जात असताना सावरोली गावाजवळ एका छोट्या टेम्पोसह इतर तीन वाहनांना धडक दिल्याची घटना  घडली आहे.या अपघातात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.   यशवंत पाटील ( ४५) असे अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव असून तो आपल्या टेम्पोतून भाजीपाल्याची वाहतूक करून सकाळी  अंबाडीहून वज्रेश्वरीच्या दिशेने निघाला होता.त्यावेळी अंबाडीच्या दिशेला जाणाऱ्या गाडी क्र.MH०४ JK ७५२१ यावरील डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याने समोरून येणाऱ्या या छोट्या टेम्पोला जोरदार धडक दिली.त्यात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर टेम्पोला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक पळून जात असतांना टेम्पोच्या पाठीमागून येणाऱ्या स्वीफ्ट आणि दुसऱ्या एका टेम्पोला धडक देऊन तेथून अंबाडीच्या दिशेला पलायन करीत असताना झिडके फाटा येथे एका दुचाकीस्वाराला धडक दिली.यावेळी येथील स्थानिक तरुणांनी सदर डम्पर चालक माधव धोंडूबा ठगे (५०)  यास पक...

धक्कादायक घटना.... मांत्रिकाच्या सांगण्यावरून विवाहितेला बेदम मारहाण करीत घरातून काढले 

इमेज
भिवंडी : मांत्रिकाने सांगितले तुमच्या सुनेला मुलबाळ होणार नाही.त्यामुळे मांत्रिकाच्या सांगण्यावरून सासरच्यांनी विवाहितेला बेदम  मारहाण करीत तिला घरातून हाकलून दिल्याची  धक्कादायक घटना  समोर आली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील देवरुंगपाडा येथे घडली  आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर  बेदम मारहाणीत जखमी झालेल्या विवाहितेवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मिताली पाटील असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव आहे.आपटी गावात राहणाऱ्या मितालीचे १५ जून २०२० रोजी तालुक्यातील देवरुंगपाडा येथे राहणाऱ्या देवेश पाटील याच्या सोबत लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या १५ दिवसानंतर लगेच पतीचे मामा ,मामी आणि नवऱ्याने तिचा छळ सुरू केला.सासरच्याना एका मांत्रिकाने मितालीला मुलबाळ होणार नाही असे असे सांगितल्याने माझा छळ सुरू झाल्याचे मितालीने सांगितले.२४नोव्हेंबर रोजी रात्री मला एका चारचाकी गाडीत घालून बेदम मारहाण करीत माझ्या माहेरी आपटी या गावातील घरातील अंगणात टाकुन दिले.इतका अमानुष ...

कांदळी येथील शाळेच्या संरक्षक भिंत बांधकामाचा भुमीपुजन सोहळा उत्साहात

इमेज
पडघा : भिंवडी तालुक्यातील मुंबई नाशीक महामार्गावरील कांदळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षक भिंत बांधणे व शाळा दुरुस्ती भुमीपुजन सोहळा विवीध मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.  जिल्हा परिषद शेष फंडातुन कांदळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम व शाळा दुरुस्ती करण्यात येणार असुन त्याच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम रविवारी शाळेच्या मैदानात घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य माजी सभापती व विद्यमान सदस्य वैशाली (ताई) चंदे, उपतालुकाप्रमुख राजेश फाफे कांदळी गावाचे ग्रामस्थ  सुभाष शेलार, रविंद्र चंदे सह विवीध मान्यवर उपस्थित होते.

संगमनेरमध्ये ' फुलोरा कलेचे माहेर घर ' व्दारा  ' भेटी लागी जीवा 'राज्यस्तरीय ८ वे कविसंमेलन संपन्न.

इमेज
मुंबई : संगमनेरच्या करेह घाटाच्या पायथ्याशी ,निसर्गाने नटलेल्या परीसरातील हाँटेल कष्णा गार्डन मध्ये रविवारी  सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ' फुलोरा कलेचे माहेर घर समुह' व्दारा राज्यस्तरीय ८ वे कविसंमेलन मोठ्या उत्साहात,जल्लोषात संपन्न झाले.कवि संमेलनात सांगोला येथील दिपाली लोखंडे व हर्षदा गुळमिरे यांनी स्वागत प्रवेशाजवळ काढलेल्या नेत्रदीपक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले.  आध्यात्मिक विषयावरील काव्यासह प्रेम,नाती,मैत्री,आत्महत्या,कोरोना,पाऊस, आदि विषयावर भारत कवितके,निलेश हेंबाडे,कतिक डिंगणकर,राजश्री बोरा,दिपाली लोखंडे,अरूण पुराणिक,रज्जाक शेख,हर्षदा गुळमिरे,रविंद्र देवरे,रंजना बोरा,आदि कवि कवयित्रीच्या कवितांना रसिकांनी मनापासून टाळ्या वाजवून दाद दिली. बीड, सोलापूर, सांगोला, शिर्डी, नगर, सांगली, मुंबई,पालघर,डहाणू,पुणे,नाशिक,मंचर अशा महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कविनी, तोंडाला मास्क लावून,योग्य सोशल डिस्टन्स ठेवून,स्वच्छता रखून,सरकारी आदेशाच्या नियमाचे पालन करून संमेलन पार पाडले. या संमेलनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी अनघा खेडकर,चंदनमल बाफना,प्रा.भगवान जोशी,रज्जाक शेख ...

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांची आत्महत्या

इमेज
  डॉ. शीतल आमटे- करजगी ह्या समाजसेवक बाबा आमटे यांची नात  चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डॉ. शितल  या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या.डॉ. शीतल  यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या क...

इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशन'तर्फे आदिवासी पाड्यात मदतीचा हात

इमेज
 जेबीसीएन शाळेतील विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी  खर्डी : हिसर येथील जेबीसीएन शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या मदतीच्या सहभागातून कसारा जवळील पेठ्याचापाडा या आदिवासी वस्तीत पोहचून मुंबईस्थित इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशननेे तिथल्या ९२ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू,मास्क व वयोवृध्दांसह तरुणांना कपडयाचे वाटप केले. सर्वत्रच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गोरगरिबांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यामुळे रोजच्या पेटणाऱ्या चुलीची भ्रांत पडून मोलमजुरी करणाऱ्यांचे हाल सुरु आहेत.मात्र याही परिस्थितीमध्ये सामाजिक भान जपणाऱ्या अनेक व्यक्ती असल्याने गोरगरिबांना काही अंशी का होईना दिलासा मिळत आहे.दहिसर येथील इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्यावतीने शनिवारी पेठ्याचापाडा वस्तीतील रहिवाश्यना सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला आहे.हा उपक्रम राबवण्याकरिता जि.प.शिक्षक महेश पवार यांनी विशेष पुढाकार घेतला.यावेेेळी इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे डॉ नारायण अय्यर,अमित सरकार,आरती गुप्ता,अमित नरीअनी,जि.प.शिक्षक राजेंद्र जगताप,महेंद्र गारे,जि.प.सदस्य विठ्ठल भगत,उपसरपंच सचिन निचिते, ग्रामस्थ भावड्या धापटे आ...

कल्याण डोंबिवलीतील आचार्य अत्रे रंगमदिर आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नाट्यनिर्मात्यांना मुळ भाड्याच्या ७५% सवलत 

इमेज
कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आचार्य अत्रे रंगमदिर आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नाट्यनिर्मात्यांना मुळ भाड्याच्या ७५% सवलत उपलब्ध करून देण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी दिली . सध्या कोरोनामुळे नाट्य व्यावसायीकांची कोलमडलेली आर्थिक परिस्थिती पाहता जागतीक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाच्या प्रशांत दामले यांनी केडीएमसी कडे याबाबतची मागणी केली होती.   राज्यातील इतर सर्व नाट्यगृहांप्रमाणेच आचार्य प्र .के .अत्रे रंगमंदिर आणि सावित्रीबाई फुले कलामंदिर ही दोन्ही नाट्यगृहेही २३ मार्च पासून बंद असल्याने नाट्य व्यवसायाला उतरती कळा लागली होती . राज्य शासनाने अटी-शर्तींचे पालन करून ५०% आसन क्षमतेवर नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च , अपुरा प्रेक्षकवर्ग ही बाब लक्षातघेता कोविडचा प्रादुर्भाव असेपर्यंत नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये सवलत मिळण्याची मागणी जागतीक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाने केली होती . त्याप्रमाणे समितीची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये ३१ मार्च २०२१ पर्यतच्या ३०० रुपये तिकीट दरांवर म...

पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी ; महिन्याभरात कामाला सुरूवात - खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे

इमेज
 कल्याण : कल्याण - शिळ मार्गावरील पलावा जॅक्शनची वाहतूककोंडी होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास ( जीएडी ) रेल्वेने मंजुरी दिल्याची माहिती खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी दिली . या उड्डाणपुलाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळूण महिन्याभरात कामाला पुन्हा सुरूवात होणार आहे.   कल्याण-शिळ रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असुन त्याचाच एक भाग म्हणून पलावा गृहसंकुल परिसरात ‘ देसाई खाडी ते काटई टोलनाक्यापर्यंतच्या उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले होते . परंतु , या उड्डाणपुलाखालून जाणा-या “डेडीकेटेड फ्रंट काॅरीडाॅरच्या “ २ मार्गीकांसाठी जागा सोडण्याची विनंती हे काम करणा-या प्राधिकरणाने केल्याने या उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला. या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असुन त्यापैकी ३७ चे काम पुर्ण झाले आहे . ४५ पैकी १२ पिलरचे काम पुर्ण झाल्याचेहि खासदार शिंदे यांनी सांगितले

उल्हासनगरातील बटरफ्लाय गार्डनमध्ये १०९ प्रजातींचे फुलपाखरू उडणार.. 

इमेज
ठाणे जिल्ह्यातील पहिला उपक्रम...  उल्हासनगर: बटरफ्लाय गार्डन हा ठाणे  जिल्ह्यातील पहिला उपक्रम उल्हासनगर मधील सपना गार्डनमध्ये राबवण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.गार्डनमध्ये १०९ प्रजातींचे फुलपाखरू,भवरे  उडताना दिसणार असून रात्रीच्यावेळी काजवे व जुगनू चमकणार आहेत. यासाठी पुढाकार घेणारे भाजपा नगरसेवक मनोज लासी यांनी ही माहिती दिली.अवघ्या १३ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात वसलेल्या उल्हासनगरात मोजकेच गार्डन बगीचे असून त्यात सर्वाधिक लोकप्रिय सपना गार्डन आहे.याच गार्डनमध्ये मनोज लासी यांच्या प्रयत्नाने आय लव उल्हासनगर हा सर्वात लांब अंतराचा इलेक्ट्रॉनिक फ्लेक्सीबल तयार झालेला असून सेल्फीसाठी तो आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे.  मनोज लासी आणि नीटस ( nitus ) या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.नीटस संस्थेचे अध्यक्ष डॉ.वरतगिरी हे शास्त्रज्ञ असून ते पर्यावरण संवर्धनाचे काम करीत असतात.त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे , मुंबई, नाशिक व अनेक  ठिकाणी बटरफ्लाय गार्डन सारखे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.याच संस्थेने नाशिक शहराजवळ एका विस्तीर्ण जागेत काजव्यांच...

ठाण्यात गुटखा बंदी कागदावरच;औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.

इमेज
ठाणे : राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर आणि उत्पादनावर बंदी आहे. मात्र, तरीही ठाणे जिल्ह्यात सहजतेने गुटखा ग्राहकांना उपलब्ध होतो. गुजरात राज्यात उत्पादन केलेला गुटखा सिल्वासा मार्गे ठाण्याच्या भिवंडी परिसरात येतो आणि जिल्हाभर वितरित करण्यात येतो. अन्न व औषधी प्रशासनाने जानेवारी ते १५ नोव्हेंबर पर्यंत १२ कोटी २२ लाख ४१ हजाराचा गुटखा जप्त करीत ४७ दुकाने सील करण्याची धडक कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिल्वासा मार्गे ठाणे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गुटख्याच्या विविध कंपन्यांच्या ब्रँडचे वितरण हे अवघ्या ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसरातही करण्यात येते.ठाण्याच्या कळवा, मुंब्रा, कौसा, रशीद कंपाउंड, शीळ डायघर, कापूरबावडी, महागिरी, कासारवडवली, वागळे इस्टेट, इंदिरानगर, अंबिकानगर अशा जवळपास शहरातील ८० टक्के पानाच्या टपऱ्यांवर विविध प्रकारचा गुटखा सहज मिळतो. गुजरात राज्यातील सिल्वासा मार्गे भिवंडीत येतो गुटखा महाराष्ट्रात बंदी असल्याने गुटख्याची मोठी मागणी असलेल्या गुटख्याचे उत्पादन गुजरात राज्यात करण्यात येते. सदर उत्पादित माल हा महाराष्ट्रात चोरट्या वाहतुकीद्वारे ठाणे जिल्ह्य...

शिवभक्त आदिवासी आश्रमशाळेचा नवा उपक्रम..

इमेज
कोरोनाच्या महामारीत मार्च पासुन शाळा बंद आहेत.या कालावधीत आश्रमशाळेतील दर्‍या खोर्‍यात राहणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांशी संपर्क होत नव्हता.नवीन शैक्षणिक वर्षात शासनाने आँनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरु केली यामुळे आमच्यापुढे मोठे संकट उभे राहिले.पालकांकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यांशी संपर्क साधने कठीण झाले होते.काही माझे शिक्षक आदिवासी वाड्यांवर जाऊन शिकवत होते.पंरतु त्यातही अनेक अडचणी उदभवत होत्या.अशावेळी कमीत कमी दहावीच्या विद्यार्थ्यांना आँनलाईन प्रक्रियेत आणण्यासाठी मोबाईलची आवशक्यता होती.प्रत्येक मुलाला मोबाईल देणे गरजेचे होते.अशावेळी अनेकांशी संपर्क साधला व याकामी यश आल.सत्य साई विद्यावाहिनी या ट्रस्ट ने ५७ मोबाईल दिले .त्यामुळे ई.१० चे विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत भाग घेऊ लागले.  शिक्षणापासुन वंचित असलेले विद्यार्थी आँनलाईन शिक्षणात भाग घेउ लागले.सर्व मुल आनंदाने सहभागी होतात.माझे सर्व शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवत असतात.दररोज वेळापत्रकानुसार अध्यापणाचे कार्य चालु आहे.शासनाने सुट्टी देऊनही आम्ही फक्त चारच दिवस सुट्टी घेतली व आँनलाईन तासिका सुरु झाल्या आहेत.मुलांना अभ्यासासाठी...

उपेक्षा भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टिटवाळा रेल्वे स्टेशनचा कायापालट

इमेज
टिटवाळा : माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि खासदार कपिल पाटील  यांच्यामुळे टिटवाळा रेल्वे स्टेशन  कायापालट होताना दिसत आहे.मागिल पाच वर्ष नागरिकांच्या समस्या, शहराची वाढती लोकसंख्या,रेल्वे स्टेशनवर येणारा ताण,एकच पादचारी पुल ई.चा विचार करुन सातत्याने खासदार कपिलजी पाटील यांच्याकडे,रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. खा.कपिल पाटील यांनी सुध्दा  रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार व  पाठपुरावा करून पादचारी पूल व बरीच कामे मंजूर केली आहेत. रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेल्या बऱ्याच स कामांना सुरुवात झाली आहे.  या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आज दि.२५/११/२०२० रोजी संध्याकाळी ५.३०वा. मा.श्री.कपिल पाटील साहेब (खासदार भिवंडी लोकसभा)टिटवाळा शहरात आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.टिटवाळा रेल्वे स्थानकावरील नागरिकांना सुरक्षित रित्या ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले असून नागरिकांनी त्याचा उपयोग सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे.नागरिकांच्या मागणी नुसार कसारा च्या दिशेने असणारा पादचारी पूल सुद्धा ...

भिवंडीत फेसबुकवरील अमेरिकन मैत्रणीने संपादक मित्रालाच घातला गंडा ; गुन्हा दाखल

इमेज
  भिवंडी: एका संपादकाला फेसबुकवरील अमेरिकन तरुणीशी मैत्री चांगलीच महागात पडल्याची घटना घडली आहे.हि घटना भिवंडी शहरातील कामतघर चंदनबाग परिसरात राहणाऱ्या एका साप्ताहिकाच्या संपादकासोबत घडली आहे.संतोष जानू चव्हाण (४२) असे फसवणूक झालेल्या संपादकाचे नाव आहे.या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अमेरिकन मैत्रिणीसह तिच्या साथीदारावर भांदवी. ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोज अँड्रीया असे गुन्हा दाखल झालेल्या अमेरिकन मैत्रणीचे नाव आहे. या दाखल गुन्हयाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  फेसबुकवर चार वर्षापासून आरोपी रोज अँड्रीयाशी मैत्री : भिवंडी शहरातुन प्रसिद्ध होणाऱ्या  एका  साप्ताहिकाचे संतोष चव्हाण हे  संपादक आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी  अमेरिकेत राहणारी आरोपी  रोज अँड्रीया हिच्या सोबत फेसबुकवरून संतोष यांची मैत्री झाली होती. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी संतोष यांनी काही कारणावरून अचानक तिचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले होते. त्यामुळे दोघांच्या मैत्रीचा संपर्क तुटला होता. मात्र काही महिन्यापूर्वी आरोपी  रोज अँड्रीया हिने पुन्हा संत...

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने बांधला वनराई बंधारा 

इमेज
वासिंद :  ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे कार्यालय व शहापूर उपविभाग यांच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील ढाकणे येथील कातकरी पाडा येथे नुकताच श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असताना पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, व शहापूर उपविभागातर्फे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्या सहकार्याने अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व ग्रामस्थ यांनी ढाकणे कातकरीपाडा येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधून या उपक्रमास सुरुवात केली. जिल्ह्यातील इतर भागातही वनराई बंधारे बांधण्याची योजना असून यासाठी ग्रामपंचायतीं पुढाकार घ्यावा असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हिरासिंग भस्मे यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता हिरासिंग भस्मे, उपकार्यकारी अभियंता कल्लापा चिवरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत, सरपंच संगिता वाघ, कनिष्ठ अभियंता प्रमिला विशे, कैलास खलाणे, अनिल शेलार, रवी विशे, केतन चौधरी, आदी कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

उल्हासनगर :  प्रांताधिकाऱ्यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याच्या भाचाला अटक

इमेज
उल्हासनगर: पाच दिवसांपूर्वी उल्हासनगरचे उपविभागीय तथा प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या शासकीय गाडीवर दगड टाकल्याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी योगीराज देशमुख याला अटक करण्यात आली होती.आता गिरासे यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी फेसबुकवर देण्यात आली असून याप्रकरणात देशमुख याचा भाचा दिलीप सुर्यवंशी याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. २४ तारखेला मनसेचे योगीराज देशमुख याने उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या शासकीय वाहनावर मोठे दगड टाकून काचा फोडल्या होत्या.शासकीय भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाची दखल घेतली जात नसल्याने रागाच्या भरात गाडीवर दगड टाकल्याची कबुली देशमुख याने व्हिडीओ द्वारे दिली होती.तर देशमुख यांची भेट गेल्या आठ महिन्यात झाली नसून जानेवारी महिन्यात भूखंडाचे प्रकरण निकाली लागल्याची माहिती गिरासे यांनी पत्रकारांना सांगितले होते.याप्रकरणी देशमुख याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशमुख याचा भाचा दिलीप सूर्यवंशी याने फेसबुकवर जगतसिंग गिरासे यांच्यावर राग व्यक्त केला आहे.देशमुख आपला मामा असल्याचे सांगून मामा सोबत मी सदैव राहील.पोस्टमध्ये सुर्यवंशी याने गिरासे यांना शिवीगाळ कर...

भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी गोरखनाथ पाटील यांची नियुक्ती 

इमेज
भिवंडी : आगामी विविध स्तरावरील सार्वत्रिक निवडणुकींची रणधुमाळी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली असून त्यामध्ये भाजप अंतर्गत कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळावे यासाठी कार्यकर्त्यांच्या विविध पदांवर नेमणुका केल्या जात आहेत.त्यानुसार भाजपचे युवा नेते तथा गाणे - फिरिंगपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोरखनाथ मोतीराम पाटील यांची भाजपा किसान मोर्चा भिवंडी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एका कार्यक्रमात खासदार कपिल पाटील व आमदार तथा भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष किसन कथोरे यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.गोरखनाथ पाटील यांची किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी पुनर्रर्र नियुक्ती झाली आहे.त्यामुळे त्यांचे भाजप नेते प्रकाश पाटील ,रमाकांत नांदूरकर, नारायण पाटील,महेंद्र म्हात्रे ,रामनाथ पाटील, विजय मुकादम ,वसंत पाटील,वामन धिंडा,अरूण जाधव ,शरद भोईर आदींसह भाजप वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान भाजपच्या किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती होताच गोरखनाथ पाटील यांनी सांगितले की आपण भविष्यात शेतकरी, कृषी तसेच गांव पातळीपासून भारत देश आत्मनिर्भय बनण्यासाठी...

बदलापुरात बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला लागली आग

इमेज
  बदलापूर :  बदलापुरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला लागली आग लागली  असून ही आग रात्री ९वाजताच्या सुमारास आग लागल्याचे प्रथमदर्शी कडून सांगण्यात येत आहे ..दरम्यान या भीषण आगीत संपूर्ण एटीएम सेंटर जळून खाक झाले आहे  ...आग कश्याने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.. मात्र या अचानकपणे लागलेल्या आगीमुळे येेथील परिसरातील रहिवाशी तसेच हे एटीएम इमारतीच्या तळमजल्यावर  असल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे हा सगळा प्रकार  प्रथमदर्शी पाहिलेल्या महिलेने आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क केले असून त्या नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून बोलविले...

पंतप्रधान पुणे दौरा..  'मिशन व्हॅक्सिन'  

इमेज
               पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशातील कोरोना विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन 'मिशन व्हॅक्सिन' पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथील , हैदराबाद आणि पुणे येथे भेट देऊन कोरोना लसीचा घेतला.पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला.पंतप्रधान जवळपास तासभर तास सीरममध्ये होते. त्यामुळे कोरोना लसीबाबत लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात असताना त्यावर मारा करण्यासाठी कोरोना लस हाती येणं अत्यंत आवश्यक आहे.ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कोरोना लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करत संबधित संस्था व कंपनीना भेट देत लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. एवढंच नाही तर लस निर्मात्या कंपन्या आणि शास्त्रज्ञांना कामगिरीबद्दल शुभेच्छाही दिल्या. पुणे विमानतळावरून पंतप्रधानांनी हेलिकॉप्ट...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भिवंडी महानगर क्षेत्राच्या वतीने संघातील पत्रकारांचे दिवाळी स्नेहसंमेलन 

इमेज
पत्रकार बांधवांनी पत्रकार  संघाचे नाव बदनाम होईल असे काम करू नये  - किशोर पाटील आपण सर्व पत्रकार एकत्र राहणं, एकत्र विचार करणं गरजेचे - दिनकर गायकवाड भिवंडी : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांच्या मार्गदर्शना खाली संघाचे  भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष किशोर बळीराम पाटील यांच्यावतीने  संघातील पत्रकारांना दिवाळी  भेट  देण्यासाठी दिवाळी स्नेह संमेलन २०२० चे आयोजन रविवार दी. २२ नोव्हेंबर २०२० रोजी  उत्तर यादव युवा संघ कार्यालय आसबिबी, खदान रोड येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रम भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी  व्यासपिठावर संघाचे पदाधिकारी   दिनकर  गायकवाड,  सुरजपाल यादव,   अशोक पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.  सर्व प्रथम आपणा सर्वांना दीपावली व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कारण आपण मोठ्या संख्येने उपस्थि...

भिवंडीत २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना चिमुरडीने वाढदिवसानिमित्त वाहिली आदरांजली 

इमेज
भिवंडी: शिवसेना युवासेनेचे उपतालुकाप्रमुख तथा समाजसेवक कल्पेश भारत केणे यांनी सामाजिक संदेश देत आपली मुलगी विरा कल्पेश केणे हिचा ५ वा वाढदिवस २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना अभिवादन करून साजरा केला.यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना आदरांजली अर्पण केली.  भिवंडी पोलिस ठाण्याच्याच्या सर्व पोलिसांचे मनोधर्य वाढावे यासाठी पोलिसांना गुलाबाची फुले व मास्क वाटप केले तसेच २६ बिसलेरी पाण्याचे बॉक्स उपलब्ध करण्यात आले.यावेळी पोलिसांकडून विराचे अभिनंदन करण्यात येऊन तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी विराचे वडील कल्पेश केणे,काका राजेशकेणे व समाजसेवक सुनील केणे व विग्नेश केणे उपस्थित होते.

"विकेल तेच पिकेल"  या चर्चा सत्रात वेहलोंडे येथील युवा उपसरपंच श्री.जितेश विशे यांनी मांडली संकल्पना... 

इमेज
अघई :  दि.२६ नोव्हेंबर  २०२० रोजी मा.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर साहेब ठाणे यांच्या दालनात जिल्ह्यातील सर्व खात्याच्या आधिकाऱ्यांच्या समोर अघई परिसरातील वेहलोंडे  गावचे युवा उपसरपंच श्री.जितेश विशे सहभागी झाले होते.अघई परिसरातील शेतकरी,आदिवासी, व बहुजन समाजाचे रोजगाराचे प्रश्न व स्थलांतरण कसे थांबवता येईल,कृषि पर्यटनावर जोर देवुन रोजगार निर्मिती त्याच बरोबर रोजगारा साठी होणारे आदिवासींचे स्थळांतरण कसे थांबवता येईल त्यांना रोजगार निर्मिती कशी करता येईल यांवर चर्चा करण्यात आली.    सध्याची शेती न परवडणारी झाली आहे सध्य परिस्थिती पहाता शेतकऱ्यांनी शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उत्पन्न वाढवने गरजेचे आहे जे बाजारात विकले जातय तेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवले पाहिजे.विकेल तेच पिकेल या चर्चा सत्रात युवा उपसरपंच श्री.जितेश विशे यांनी मा. ठाणे जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांना प्रेझेंटेंशन  देवुन संकल्पना पटवुन दिली.

बदलापूरकरांना पाण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार 

इमेज
सरकारच्या दोन विभागांची कागदी घोडे नाचविण्याची सर्कस गेली चार वर्षे सुरूच.   बदलापूर : शहराला अतिरिक्त सहा दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भोज धरणात पाणीसाठा आरक्षित करण्यात आला. मात्र, या धरणातून गाळ काढल्याशिवाय जलवाहिन्या टाकू दिल्या जाणार नाहीत, अशी अट स्थानिक शेतकऱ्यांनी घातल्यानंतरही गेल्या चार वर्षांत धरणाचा गाळ काढण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे अमृत योजनेच्या टप्पा-१मधील काम गेले चार वर्षे रखडले आहे. गाळ काढण्यासाठी कोणतीही तरतूद नाही, असे पाटबंधारे विभाग सांगत आहे. तर हे काम पाटबंधारे विभागाचेच असल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला आहे. सध्या शहरासाठी उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते.भविष्यात अतिरिक्त पाण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाच्या भोज धरणातून सहा दशलक्ष लिटर पाण्याचे आरक्षण मिळवले. त्यासाठी अमृत योजना टप्पा-१ मध्ये १८ कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी सुमारे पाचशे जलवाहिन्या कर्जत राज्यमार्गालगत पडून आहेत. भोज धरण ते खरवईपर्यंत या जलवाहिन्या टाकणे अपेक्षित होते. मात्र...

वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा अजब कारभार

इमेज
अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर बिगरआदिवासी शिक्षकांची भरती  भिवंडी: आदिवासी समाजातील शिक्षित तरुणांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने आदिवासी समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये हक्क व अधिकार मिळावा यासाठी राज्यघटनेनुसार आरक्षणाचा अधिकार दिला आहे . मात्र स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासी शिक्षकाला नोकरीत डावलून त्याऐवजी संस्थाचालकांच्या मर्जीतील व नाते संबंधातील बिगर आदिवासी समाजातील शिक्षकांची संस्थेने शाळांमध्ये भरती केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत घडल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आपल्याला न्याय मिळावा यासाठी आदिवासी शिक्षकाने जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित इतर शिक्षण विभागाशी निगडित असलेल्या शासकीय विभागांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून या बोगस नियुक्तीच्या आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करून गैरकारभार करणाऱ्या संस्थाचालकांसह इतर जबाबदार यंत्रणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षकानेच केली आहे त्यामुळे वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा  गैरकारभार समोर आला आहे. ...

डोंबिवली एम आय डी सी.तील प्रदूषण रंगीबेरंगी.     

इमेज
डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्येने येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) रासायनिक प्रदूषणामुळे परिसरातील रस्ते, गटारातील पाणी हिरवे, गुलाबी झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. आता शुक्रवारी  सकाळी एमआयडीसीतील गटारांमधून चक्क रसायनमिश्रित निळे पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्याला उग्र वासही येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिसराची पाहणी करत प्रदूषण रोखा अन्यथा कंपन्यांना टाळे लावा, असे आदेशही दिले होते. आता शहरे अनलॉक होताच प्रदूषणाच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे.डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे, तसेच रसायनमिश्रीत पाण्यामुळे निवासी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.  रासायनिक प्रदूषणामुळे एमआयडीसीत हिरवा, नारंगी पाऊस, त्यानंतर रसायनामुळे गुलाबी झालेले रस्ते यापूर्वी पाहिले आहेत. या रसायनांच्या उग्र वासामुळे डोके दुखी, डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास अडचणी आदी गोष्टींचा त्रास नागरिकांना होतो. याविषयी त...

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार -  जगन्नाथ  शिंदे    

इमेज
राज्यात आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सुतोवाच माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले आहे .कल्याण डोंबिवली मध्ये राष्ट्रवादीला लागलेली घरघर थांबवण्यासाठी वरिष्ठांनी पुन्हा एकदा जिल्हा अध्यक्ष पदाची सूत्रे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हाती दिली.  त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मध्ये चैतन्य निर्माण झाले आहे .संविधान दिनानिमित्त जिल्हाअध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  उद्यानात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह संविधानाचे वाचन केले .त्यानंतर २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या. पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना जगन्नाथ शिंदे यांनी संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतल्याचे सांगितले. तसेच मला पक्ष बांधणी व पक्ष विस्तारासाठी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.  राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीतर्फे देण्यात येतील. याबाबत वरिष्ठ निर्णय घ...

सरकारला दोन्ही बाजूने हायकोर्टाने फटकारले.

इमेज
अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई करत तिचे कार्यालय तोडण्यात आले होते. यावरून कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. आता, उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. 'महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,' असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडं, अन्वय नाईक प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण देखील अधिक चिघळलं होतं. या कारवाईवरून विरोधकांनी राज्य सरकारवर तोफ डागली होती. जामीनासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर राज्य सरकारला दणका देत सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राज्य सरकारला झापलं आहे. ‘राज्य सरकार काही व्यक्तींना निशाण्यावर ठेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असेल, तर सुप्रीम कोर्ट नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करेल,’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारले आहे.

येत्या १ डिसेंबर पासून एफ केबिन रोड वाहतुकीसाठी खुला;नागरिकांना मिळणार दिलासा

इमेज
कल्याण : कल्याण पूर्वेतील एफ केबिन रोड वाहतुकीसाठी खुला होणार असून या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून या कामाची पाहाणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केली. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे एमएमआरडीएच्या निधीतून कल्याण(पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्व. आनंद दिघे साहेब उड्डाणपूल (एफ कॅबिन ब्रिज) पर्यंत काँक्रीट रस्ता तयार करणेचे काम हाती घेतले होते. हा रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सेवा वाहिन्यांकरीता रस्त्याच्या कडेने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एफ कॅबिन ब्रिज येथे वारंवार खड्डे पडत असल्याने महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती निधीमधून उड्डाण पुलावर मास्टीक अस्‍फाल्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सदर ब्रिजवर एक्स्पांशन जॉइंट तुटलेले असल्याने तातडीने दरपत्रके मागवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सदर एक्स्पांशन जॉइंटचे काम पुर्ण झालेले असून क्युरींग करीता ३० नोव्हेंबरपर्यंत वाहतूक बंद...

३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन ;केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर 

इमेज
मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लॉकडाउन  वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगेनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. खरंतर, देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये ...

वाड्यातील भात खरेदी केंद्रे अद्यापही सुरू नाहीत;शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे ..

इमेज
वाडा : दिवाळीपुर्वी मोठा गाजावाजा करत आमदार दौलत दरोडा, आमदार सुनील भुसारा व आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत वाडा तालुक्यातील विविध ठिकाणी आधारभूत भात खरेदी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र गेले अठरा दिवस झाले तरी प्रत्यक्षात आजपर्यंत एकही ठिकाणचे भात खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. ऐन दिवाळीत येथील अनेक शेतकऱ्यांवर मातीमोल भावाने आपले भात व्यापा-यांना देऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतिक्षित आधारभूत खरेदी केंद्रांचे उद्घाटने ९ नोव्हेंबर रोजी वाडा तालुक्यातील परळी व पोशेरी या दोन ठिकाणी  करण्यात आली. यावेळी तालुक्यांत अन्य सात ठिकाणी अशाच प्रकारची भात खरेदी केंद्र उद्यापासून सुरू होतील असे या उद्घाटन प्रसंगी आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले.मात्र नव्याने दुसरी खरेदी केंद्र सुरू झाली नाहीच, पण प्रत्यक्षात उद्घाटन करण्यात आलेल्या केंद्रांवरच आजपर्यंत खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भाताला आधारभूत केंद्रांवर चांगला दर ...

 "शाळेबाहेरची शाळा " या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वैजोळा झूम कॉलमध्ये १००% सहभागी

इमेज
ठाणे जिल्हा परिषद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन  यांच्या  संयुक्त विद्यमाने दिनांक २७/११/२०२० रोजी  "शाळेबाहेरची शाळा " या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वैजोळा  केंद्र शिवनगर ता भिवंडी , ठाणे  झूम कॉलमध्ये १००% सहभागी झाली.आजच्या या झूम कॉल मध्ये एक ते सात गट सहभागी झाले .प्रत्येक गटाचा झूम कॉल चाळीस मिनिटांचा होता .विविध राज्यातील प्रथम संस्थेची कार्यान्वित असणाऱ्या तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले .त्या तज्ञ व्यक्ती जुनेजा साक्षी ,पटनाईक संपत सर ,कृष्णा अनु पोज युवा, सुरेश श्रीपदा ,मेल्होत्रा समिक्षा मॅम, जैन सलोनी मॅम यांनी बेंगलोर ,हैदराबाद ,पांडेचरी , पंजाब अशा भारतातील विविध ठिकाणांहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.    या झूम मीटिंग कॉल मध्ये प्रत्येक गटात चार विद्यार्थी सहभागी होते .मुलांना त्यांचा परिचय ,छंद ,आवड, गायन इत्यादीविषयी गप्पा गोष्टी करत आनंददायी वातावरणात चर्चा केली. तसेच मराठी ,गणित ,विज्ञान, इंग्रजी ,मूल्यशिक्षण या सर्व विषयांना अनुसरून सुंदर अशा पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले .यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभ...

वाड्यात लोखंडाचा गोरख धंदा सुरूच 

इमेज
वाडा: तालुक्यातील अनेक धाब्यांवर ट्रकमधून लोखंडाचे बंडल उतरवून त्याचा धंदा राजरोसपणे सुरुच असून हा धंदा पोलिसांच्या आर्शीवादाने होत असल्याचे बोलले जात आहे.या धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होताना दिसून येत आहे.तालुक्यात लोखंडाच्या उत्पादन करणा-या अनेक कंपन्या असून या कंपनीत तयार होणारा लोखंडाचा माल मुंबई ,ठाणे आदी ठिकाणी जात असतो.सदरचा माल कंटेनर मधून नेला जात असताना कंटेनरचे चालक गाडीतील दोन चार लोखंडाचे बंडल हा व्यवसाय करणा-यांना अल्प किंमतीत देत असतात. भिवंडी वाडा महामार्गावरून दररोज शेकडो वाहने जात असतात. या वाहनांतून अनेक ठिकाणी लोखंड बंडल उतरवून घेतले जातात.त्यानंतर एका रात्री त्याची विल्हेवाट लावली जाते. विशेषतः हा धंदा रात्रीच्या पोटात केला जातो.लोखंडाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक अथवा बांधकाम व्यावसायिक हा माल घेत असतात. गाडीवाल्यांकडून एका बंडलला दोन ते अडीच हजार रुपये घेतले जातात तर व्यावसायिकांना तीन ते साडेतीन हजार रुपयांना हा माल विकला जातो. एका रात्रीत धंदेवाले लाखोंचा नफा कमवत असल्याने हा धंदा तेजीत आला आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी नारे येथील  चारमिनार कं...

रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेच्या पाठपुराव्याला यश

इमेज
परिवहन विभागाने मंञालयात बोलावली सयुंक्तिक बैठक कल्याण : रिक्षा टॅक्सी चालकांचे अनेक वर्ष शासन दरबारी रिक्षा टॅक्सी चालकांचे खुले रिक्षा परवाने बंद करणे, कल्याणकारी महामंडळ अमलबजावणी, प्रलंबित भाडे दरवाढ व इतर मागण्या तात्काळ सोडविण्या संदर्भात मंञलयात परिवहन मंञी अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे व मुबंई एम.एम.आर.डी.ए. क्षेञातील रिक्षा टॅक्सी संघटना प्रतिनिधी यांची सयुंक्तिक बैठक शुक्रवारी बोलावली होती. रिक्षा टॅक्सी संघटनाचां सात्तत्याने केलेला पाठपुरावा याची दखल घेऊन खुद्द परिवहन मंञी यांनी परिवहन विभागास संयुक्तिक बैठक आयोजनाचे निर्देश दिले होते. यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांच्या काही प्रमुख मागण्या लवकरच मान्य होतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. बैठकित मुबंई प्रमुख रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी प्रलंबित मागण्या सोबतच दहा वर्ष जुनी रिक्षा परवान्यावर बदली करण्याची परवानगी द्यावी ही  मागणी केली.  या बैठकीस कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर, एकनाथ पिगंळे, संतोष नवले, ऋषीके...

भिवंडी कल्याण मार्गावर महाकाय झाड कोसळले ; सुदैवाने जिवीत हानी टळली

इमेज
भिवंडी:  कल्याण-भिवंडी मार्गावर असलेल्या लाहोटी कंपाउंडच्या बाजूला एक महाकाय झाड कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी घडली नसली तरी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चार चाकी टेम्पो व एका दुचाकीवर हे झाड कोसळल्याने या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने कल्याण भिवंडी मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पालिका आपत्ती व्यवस्थापन , वाहतूक पोलीस व अग्निशम दलाने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले झाड कटर मशीनच्या सहाय्याने कापून त्याला हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.विषेश म्हणजे हि घटना घडण्याआधी केवळ १५ ते २० मिनिटे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र वाहतूक पोलोसांच्या सतर्कतेने हि वाहतूक कोंडी सुटली आणि हे झाड कोसळले.त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीत हानी टळली आहे.

प्राथमिक शिक्षिका मंगला साळवी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न

इमेज
 पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा  येथील सेवा ज्येष्ठ शिक्षिका सौ मंगला मनोहर साळवी यांनी  ३० वर्षे सेवा पूर्ण करून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली त्यांनी केलेल्या सेवेप्रित्यर्थ त्यांचा शाळेकडून निरोप समारंभ करण्यात आला त्या समारंभाला एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुधीर जोशी प्रशासनाधिकारी शंकर भट चिंचणीकर सर मुख्याध्यापिका कलावती पाटील गौरवमूर्ती सौ.मंगला साळवी गौरव मूर्ती सरोज भागवत (शिपाई मावशी)यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.   प्राथमिक शिक्षिका मंगला साळवी यांनी तीस वर्षे सेवा पूर्ण केली आणि स्वेच्छा- निवृत्ती घेतली म्हणून शाळेकडून त्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पेण एज्युकेशन सोसायटी शिक्षक पतपेढी तर्फे  चेअरमन पडळकर व संचालिका गीता म्हात्रे यांच्या हस्ते मायेची शाळ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका कलावती पाटील यांनी साळवीबाई यांच्या जीवनातील प्रसंगाचे वर्णन करून शिस्तप्रिय व आज्ञाधारक शिक्षिका म्हणून केलेले काम विद्यार्थी घडवि...

चालत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग; ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न

इमेज
रेल्वे प्रवासात पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर   कल्याण : कसारा जवळील आठगाव स्टेशन दरम्यान  धावत्या लोकलमध्ये दोन तरूण तळीरामांकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आला. इतकेच नाही तर विनयभंग करून या तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी साडेदहाच्या सुमारास घडला.प्रसंगावधान दाखवित धर्याने प्रतिकार करीत बचाव केला. पिडित तरुणीनी आपला  बचाव करीत कसारा स्थानकात लोकल येई पर्यंत आरोपी तरूणांनाशी प्रतिकार केला. कसारा येथे राहणारी २१ वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करते. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ही तरुणी साडेनऊच्या सुमारास ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बसली. या डब्यात अन्य प्रवासी महिला होत्या. ही ट्रेन आठगाव स्थानक गाठेर्पयत रिकामी झाली होती. डब्यात केवळ ही तरुणी एकटीच होती. आठगाव स्थानकात हि लोकल ट्रेन सोडत असतांना दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत धुंद होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगेच तिच्या मोबाई...

बांद्रा पश्चिम  येथे  मॅक डोनाल्ड बंगल्यावर मुबंई समाजसेवा शाखेची धाड अल्पवयीन मुलीची सुटका

इमेज
बांद्रा :  येथील मॅक डोनाल्ड बंगल्यावर समाजसेवा शाखेनी धाड टाकुन वेश्या व्यवसाय करिता आणलेल्या  अल्पवयीन मुलीची सुटका केली. ऊल्हासनगर येथील एका अल्पवयीन १३ वर्षाच्या  मुलीची  मुंबई येथे विक्री करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस समाजसेवा शाखेला मिळाली होती हया माहितीच्या आधारे बांद्रा येथील मॅक डोनाल्ड बंगला येथे धाड टाकण्यात आली. धाड टाकली असता अल्पवयीन मुली कडुन वेश्या व्यवसाय करत असल्याचे आढळून आले निलेश चंद्रकांत मढवी आणि वर्षा निलेश मढवी ह्या दोन्ही गुन्हेगारांना यांना अटक करण्यात आली.  सदर केस 712/2020/366(A)370(1)(4),372,34 IPS R/W SEC 4,5 ITPA R/W 16/17/18 POCSO या कलमान्वये बांद्रा पोलीस स्टेशनला गुन्हा  रजिस्टर करण्यात आला आहे .  ही धाड यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदेश रेवले  त्यांची टीम भुषण रामोळे,महेश पवार, सचीन पाटसुपे, सचीन चांदगावकर महिला पोलीस साठे , सानप आणि चालक कानडे व खैरे  यांनी मेहनत घेतली.