बांद्रा पश्चिम  येथे  मॅक डोनाल्ड बंगल्यावर मुबंई समाजसेवा शाखेची धाड अल्पवयीन मुलीची सुटका


बांद्रा : येथील मॅक डोनाल्ड बंगल्यावर समाजसेवा शाखेनी धाड टाकुन वेश्या व्यवसाय करिता आणलेल्या  अल्पवयीन मुलीची सुटका केली. ऊल्हासनगर येथील एका अल्पवयीन १३ वर्षाच्या  मुलीची  मुंबई येथे विक्री करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस समाजसेवा शाखेला मिळाली होती हया माहितीच्या आधारे बांद्रा येथील मॅक डोनाल्ड बंगला येथे धाड टाकण्यात आली. धाड टाकली असता अल्पवयीन मुली कडुन वेश्या व्यवसाय करत असल्याचे आढळून आले निलेश चंद्रकांत मढवी आणि वर्षा निलेश मढवी ह्या दोन्ही गुन्हेगारांना यांना अटक करण्यात आली. 


सदर केस 712/2020/366(A)370(1)(4),372,34 IPS R/W SEC 4,5 ITPA R/W 16/17/18 POCSO या कलमान्वये बांद्रा पोलीस स्टेशनला गुन्हा  रजिस्टर करण्यात आला आहे .  ही धाड यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदेश रेवले  त्यांची टीम भुषण रामोळे,महेश पवार, सचीन पाटसुपे, सचीन चांदगावकर महिला पोलीस साठे , सानप आणि चालक कानडे व खैरे  यांनी मेहनत घेतली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...