संगमनेरमध्ये ' फुलोरा कलेचे माहेर घर ' व्दारा ' भेटी लागी जीवा 'राज्यस्तरीय ८ वे कविसंमेलन संपन्न.
मुंबई : संगमनेरच्या करेह घाटाच्या पायथ्याशी ,निसर्गाने नटलेल्या परीसरातील हाँटेल कष्णा गार्डन मध्ये रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ' फुलोरा कलेचे माहेर घर समुह' व्दारा राज्यस्तरीय ८ वे कविसंमेलन मोठ्या उत्साहात,जल्लोषात संपन्न झाले.कवि संमेलनात सांगोला येथील दिपाली लोखंडे व हर्षदा गुळमिरे यांनी स्वागत प्रवेशाजवळ काढलेल्या नेत्रदीपक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले.
आध्यात्मिक विषयावरील काव्यासह प्रेम,नाती,मैत्री,आत्महत्या,कोरोना,पाऊस, आदि विषयावर भारत कवितके,निलेश हेंबाडे,कतिक डिंगणकर,राजश्री बोरा,दिपाली लोखंडे,अरूण पुराणिक,रज्जाक शेख,हर्षदा गुळमिरे,रविंद्र देवरे,रंजना बोरा,आदि कवि कवयित्रीच्या कवितांना रसिकांनी मनापासून टाळ्या वाजवून दाद दिली. बीड, सोलापूर, सांगोला, शिर्डी, नगर, सांगली, मुंबई,पालघर,डहाणू,पुणे,नाशिक,मंचर अशा महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कविनी, तोंडाला मास्क लावून,योग्य सोशल डिस्टन्स ठेवून,स्वच्छता रखून,सरकारी आदेशाच्या नियमाचे पालन करून संमेलन पार पाडले.
या संमेलनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी अनघा खेडकर,चंदनमल बाफना,प्रा.भगवान जोशी,रज्जाक शेख ,समुहप्रमुख सुनिल सातपुते व्यासपिठावर मान्यवर उपस्थित होते.ज्यांनी आप आपली पुस्तके ' साहित्य रत्न पुरस्कारा' साठी पाठविली होती त्यांना ' साहित्य रत्न पुरस्कार' मान्यवरांच्या हस्ते वितरीत केला गेला.कवि संमेलनाचे सूत्र संचालन रंजना बोरा व सुनिल सातपुते यांनी मनोरंजनात्मक,उपदेशात्मक पध्दतीने करून रसिकांची मने जिंकली,तर प्रस्ताविक व आभार रज्जाक शेख यांनी मानले.