चांगल्या कामाचे मनसे नेहमी कौतुक करणार:- जिल्हा सचिव रुपेश पाटील


  पेण : मुंबई गोवा महामार्गावरील हमरापूर फाट्याच्या खराब रस्त्याबाबत वारंवार चर्चा करून व निवेदन देऊन दुर्लक्ष केल्याने  मनसेचे  रुपेश पाटील हे आक्रमक झाले होते. लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी आणि डांबरीकरण करून देणार असा  शब्द ठेकेदारांनी दिला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील इरवाडी, हमरापुर फाटा नजीकच्या रस्त्याचे डांबरीकरण करून प्रवाशांना चांगला रस्ता तयार केल्यामुळे दिलेल्या शब्द पाळल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदार व कामगार यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच प्रशासनाचे पण आभार मानले.


  रस्त्यावरील अवाजवी खड्डे आणि सतत उडणारी धूळ पाहता प्रवाशांना आणि वाहनधारकांना तसेच मोटारसायकल स्वार यांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत होते. मात्र मनसेतर्फे शेवटचा इशारा दिल्याने अखेर रस्त्यावर डांबरीकरण झाल्याने समाधान व्यक्त करत मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील म्हणाले की मनसे फक्त विरोधातच नसते तर जे चांगले आहे ते चांगले म्हणणार आणि चांगल्या कामाचा नेहमी कौतुकही करणार असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...