बस अपघातात मृत महिलेच्या कुटुंबास जिजाऊची मदत


 
वाडा: वंदना सजन लहागे (३२)उजैणी ता.वाडा या महिलेचा दि.२७रोजी  बस अपघातात पिक हातोबा येथे अपघाती मृत्यू झाला होता. सदर महिलेस तीन मुले असून तीनही मुले शिक्षण घेत आहेत.सदर ची घटना .निलेश भगवान सांबरे उपाध्यक्ष जि प पालघर तथा संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था  यांना समजतात सदर महिलेच्या कुटुंबास २५०००/- (पंचवीस हजार रुपये) आर्थिक मदत करण्यात आली. 


सदरची आर्थिक मदत जि प सदस्य .शशिकांत पाटील, जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष जि प सदस्य .संदेश ढोणे  यांच्या हस्ते देण्यात आली.तसेच शासनाकडून मदतीसाठी अनिल परब  परिवहन मंत्री,  जिल्हाधिकारी पालघर व आगार व्यवस्थापक वाडा यांना संस्थेकडून पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच यापुढे सदर मृत महिलेच्या तीनही मुलांना शैक्षणिक मदत लागल्यास जिजाऊ संस्थेकडून सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...