पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी ; महिन्याभरात कामाला सुरूवात - खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे
कल्याण : कल्याण - शिळ मार्गावरील पलावा जॅक्शनची वाहतूककोंडी होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास ( जीएडी ) रेल्वेने मंजुरी दिल्याची माहिती खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी दिली . या उड्डाणपुलाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळूण महिन्याभरात कामाला पुन्हा सुरूवात होणार आहे.
कल्याण-शिळ रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असुन त्याचाच एक भाग म्हणून पलावा गृहसंकुल परिसरात ‘ देसाई खाडी ते काटई टोलनाक्यापर्यंतच्या उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले होते . परंतु , या उड्डाणपुलाखालून जाणा-या “डेडीकेटेड फ्रंट काॅरीडाॅरच्या “ २ मार्गीकांसाठी जागा सोडण्याची विनंती हे काम करणा-या प्राधिकरणाने केल्याने या उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला. या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असुन त्यापैकी ३७ चे काम पुर्ण झाले आहे . ४५ पैकी १२ पिलरचे काम पुर्ण झाल्याचेहि खासदार शिंदे यांनी सांगितले