प्राथमिक शिक्षिका मंगला साळवी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न
पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा येथील सेवा ज्येष्ठ शिक्षिका सौ मंगला मनोहर साळवी यांनी ३० वर्षे सेवा पूर्ण करून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली त्यांनी केलेल्या सेवेप्रित्यर्थ त्यांचा शाळेकडून निरोप समारंभ करण्यात आला त्या समारंभाला एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुधीर जोशी प्रशासनाधिकारी शंकर भट चिंचणीकर सर मुख्याध्यापिका कलावती पाटील गौरवमूर्ती सौ.मंगला साळवी गौरव मूर्ती सरोज भागवत (शिपाई मावशी)यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षिका मंगला साळवी यांनी तीस वर्षे सेवा पूर्ण केली आणि स्वेच्छा- निवृत्ती घेतली म्हणून शाळेकडून त्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पेण एज्युकेशन सोसायटी शिक्षक पतपेढी तर्फे चेअरमन पडळकर व संचालिका गीता म्हात्रे यांच्या हस्ते मायेची शाळ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका कलावती पाटील यांनी साळवीबाई यांच्या जीवनातील प्रसंगाचे वर्णन करून शिस्तप्रिय व आज्ञाधारक शिक्षिका म्हणून केलेले काम विद्यार्थी घडविण्यासाठी तीस वर्षे घेतलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद असल्याने सांगून सहकारी शिक्षकांनी साळवी बाईंच्या अनेक चांगल्या गुणांचे वर्णन करून नेहमी मायेचा हात पाठीवर फिरवून जे मार्गदर्शन केले ते कायम स्मरणात राहणार असे सांगून अनेकांच्या डोळ्यातून अश्रूधारा आल्या .
यावेळी गौरवमूर्ती साळवी बाईंनी सांगितले की माझ्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी माजी मुख्याध्यापिका सौ. वनिता चंदने श्रीमती पाटीलमॅडम आणि सर्व शिक्षकांनी जे मला सहकार्य केलं ते मी कायमस्वरूपी स्मरणात ठेवणार असे त्यांनी सांगितले.तर संचालक सुधीर जोशी यांनी सांगितले की प्रामाणिकपणे काम केलेल्या साळवी बाई यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थी घडविण्याचे चांगले काम त्यांच्या हातून घडल्याने त्यांचे विशेष अभिनंदन केले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली