उल्हासनगर :  प्रांताधिकाऱ्यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याच्या भाचाला अटक


उल्हासनगर: पाच दिवसांपूर्वी उल्हासनगरचे उपविभागीय तथा प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या शासकीय गाडीवर दगड टाकल्याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी योगीराज देशमुख याला अटक करण्यात आली होती.आता गिरासे यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी फेसबुकवर देण्यात आली असून याप्रकरणात देशमुख याचा भाचा दिलीप सुर्यवंशी याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.


२४ तारखेला मनसेचे योगीराज देशमुख याने उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या शासकीय वाहनावर मोठे दगड टाकून काचा फोडल्या होत्या.शासकीय भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाची दखल घेतली जात नसल्याने रागाच्या भरात गाडीवर दगड टाकल्याची कबुली देशमुख याने व्हिडीओ द्वारे दिली होती.तर देशमुख यांची भेट गेल्या आठ महिन्यात झाली नसून जानेवारी महिन्यात भूखंडाचे प्रकरण निकाली लागल्याची माहिती गिरासे यांनी पत्रकारांना सांगितले होते.याप्रकरणी देशमुख याला अटक करण्यात आली होती.


त्यानंतर देशमुख याचा भाचा दिलीप सूर्यवंशी याने फेसबुकवर जगतसिंग गिरासे यांच्यावर राग व्यक्त केला आहे.देशमुख आपला मामा असल्याचे सांगून मामा सोबत मी सदैव राहील.पोस्टमध्ये सुर्यवंशी याने गिरासे यांना शिवीगाळ करून गाडीसह जाळण्याची धमकी त्याने दिली आहे.हा प्रकार समजताच सहायक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर,पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी उपविभागीय कार्यालयात जाऊन जगतसिंग गिरासे यांची भेट घेतली.गिरासे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी दिलीप सूर्यवंशी याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक योगेश गायकर हे करीत आहेत .


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...