"शाळेबाहेरची शाळा " या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वैजोळा झूम कॉलमध्ये १००% सहभागी
ठाणे जिल्हा परिषद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७/११/२०२० रोजी "शाळेबाहेरची शाळा " या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वैजोळा केंद्र शिवनगर ता भिवंडी , ठाणे झूम कॉलमध्ये १००% सहभागी झाली.आजच्या या झूम कॉल मध्ये एक ते सात गट सहभागी झाले .प्रत्येक गटाचा झूम कॉल चाळीस मिनिटांचा होता .विविध राज्यातील प्रथम संस्थेची कार्यान्वित असणाऱ्या तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले .त्या तज्ञ व्यक्ती जुनेजा साक्षी ,पटनाईक संपत सर ,कृष्णा अनु पोज युवा, सुरेश श्रीपदा ,मेल्होत्रा समिक्षा मॅम, जैन सलोनी मॅम यांनी बेंगलोर ,हैदराबाद ,पांडेचरी , पंजाब अशा भारतातील विविध ठिकाणांहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या झूम मीटिंग कॉल मध्ये प्रत्येक गटात चार विद्यार्थी सहभागी होते .मुलांना त्यांचा परिचय ,छंद ,आवड, गायन इत्यादीविषयी गप्पा गोष्टी करत आनंददायी वातावरणात चर्चा केली. तसेच मराठी ,गणित ,विज्ञान, इंग्रजी ,मूल्यशिक्षण या सर्व विषयांना अनुसरून सुंदर अशा पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले .यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय छान व उत्स्फूर्त होता.कोरोना व्हायरस याविषयी प्रत्येक गटाला सुरक्षितता व काय केले पाहिजे याविषयी चर्चा व मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या विविध ऍक्टिव्हिटी मधील उत्स्फूर्त सहभाग पाहून त्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले .विशेष म्हणजे प्रत्येक मूल आणि मूल हे बोलत होते,खूपच सुंदर वाटले .
विशेष म्हणजे प्रशिक्षणातून वेळ काढून या झूम कॉल मध्ये चौथ्या गटात माननीय श्री .सुनील पाटील सर केंद्रप्रमुख - शिवनगर यांनीसुद्धा भेट दिली . उपक्रमाविषयी भरभरून कौतुक केले .उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. "शाळेबाहेरची शाळा " यामध्ये निवड केल्यामुळे आज मुलांना अनोखा व अविस्मरणीय अनुभव मिळाला .या उपक्रमात पालक,विद्यार्थी ,स्वयंसेवक ,शिक्षक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा सहभाग छान मिळाला.तसेच या कार्यक्रमाची मुख्य दिशा आणि प्रेरणा देणाऱ्या माननीय सौ. ऋतुजा पाटील प्रोग्राम हेड तसेच प्रमोद मुगल सर प्रथम संस्था व संपूर्ण टीमनी मेहनत घेतली