"विकेल तेच पिकेल"  या चर्चा सत्रात वेहलोंडे येथील युवा उपसरपंच श्री.जितेश विशे यांनी मांडली संकल्पना... 


अघई : दि.२६ नोव्हेंबर  २०२० रोजी मा.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर साहेब ठाणे यांच्या दालनात जिल्ह्यातील सर्व खात्याच्या आधिकाऱ्यांच्या समोर अघई परिसरातील वेहलोंडे  गावचे युवा उपसरपंच श्री.जितेश विशे सहभागी झाले होते.अघई परिसरातील शेतकरी,आदिवासी, व बहुजन समाजाचे रोजगाराचे प्रश्न व स्थलांतरण कसे थांबवता येईल,कृषि पर्यटनावर जोर देवुन रोजगार निर्मिती त्याच बरोबर रोजगारा साठी होणारे आदिवासींचे स्थळांतरण कसे थांबवता येईल त्यांना रोजगार निर्मिती कशी करता येईल यांवर चर्चा करण्यात आली. 


  सध्याची शेती न परवडणारी झाली आहे सध्य परिस्थिती पहाता शेतकऱ्यांनी शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उत्पन्न वाढवने गरजेचे आहे जे बाजारात विकले जातय तेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवले पाहिजे.विकेल तेच पिकेल या चर्चा सत्रात युवा उपसरपंच श्री.जितेश विशे यांनी मा. ठाणे जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांना प्रेझेंटेंशन  देवुन संकल्पना पटवुन दिली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...