वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा अजब कारभार

अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर बिगरआदिवासी शिक्षकांची भरती 



भिवंडी: आदिवासी समाजातील शिक्षित तरुणांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने आदिवासी समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये हक्क व अधिकार मिळावा यासाठी राज्यघटनेनुसार आरक्षणाचा अधिकार दिला आहे . मात्र स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासी शिक्षकाला नोकरीत डावलून त्याऐवजी संस्थाचालकांच्या मर्जीतील व नाते संबंधातील बिगर आदिवासी समाजातील शिक्षकांची संस्थेने शाळांमध्ये भरती केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत घडल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आपल्याला न्याय मिळावा यासाठी आदिवासी शिक्षकाने जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित इतर शिक्षण विभागाशी निगडित असलेल्या शासकीय विभागांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून या बोगस नियुक्तीच्या आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करून गैरकारभार करणाऱ्या संस्थाचालकांसह इतर जबाबदार यंत्रणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षकानेच केली आहे त्यामुळे वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा  गैरकारभार समोर आला आहे.  



वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे रेणुका विद्यालय झिडके विद्यालय असून या विद्यालयात यदुनाथ शांताराम कोदे हे सन जून  २०१३ पासून ते आजपर्यंत सहशिक्षक या पदावर कार्यरत आहेत.तब्बल सात वर्ष काम करूनही संस्थेने त्यांच्या कायम स्वरूपी नियुक्तीसाठी मान्यतेचा अहवाल वेळेत ठाणे जिल्हा परिषदेच्या संबंधित शिक्षण विभागास न देता तो एक वर्ष उशिराने सादर केला आहे. तसेच या संस्थेत कार्यरत असलेल्या आदिवासी शिक्षक व शिकक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडे देखील संस्थेचे पदाधिकारी वेळोवेळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील कोदे यांनी आपल्या लेखी तक्रारीत केला आहे.


विशेष म्हणजे संस्थेत आदिवासी शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी आदिवासींचा राखीव कोटा शिल्लक असतांनाही संस्थाचालक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या निकटवर्तीय व बिगर आदिवासी असलेल्या शिक्षकांची भरती करत आहेत . अनुसूचित जाती व जमातींचा अनुशेष डावलून संस्था चालक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून आपण आदिवासी समाजातील असल्यामुळेच केवळ जातीच्या राजकारणातून आपल्याला डावलण्यात येत असल्याचा आरोप देखील यदुनाथ कोदे यांनी आपल्या लेखी तक्रारीत केला आहे. त्यामुळे संस्थेची २००९ पासून सखोल चौकशी करावी व संस्थेच्या दोशी संचालकांवर कायदेशीर कारवाई करून संस्थेने आर्थिक गैरव्यवहारातून केलेल्या बिगर आदिवासी व निकटवर्तीय शिक्षकांची मान्यता रद्द करावी अशी मागणी सहशिक्षक यदुनाथ कोदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सहशिक्षक यदुनाथ कोदे यांनी आपण भविष्यात कायम स्वरूपी नोकरीत समाविष्ट होऊ या आशेपोटी बिनपगारी सात वर्षे सेवा केली आहे. हि सेवा बजावत असताना त्यांनी ५ वी ते ७ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवले आहेत.


या काळात त्यांचे रेणुका विद्यालय झिडके या शााळेच्या सन २०१५-१६ शिक्षक यादीत नाव प्रसिद्ध झाले आहे. तर सन २०१४-१५ सर्व शिक्षा अभियान गट पंचायत समिती भिवंडी येथे गटशिक्षणाधिकारी प्रशिक्षण घेतले आहे.रेणुका विद्यालय झिडके यांनी अभ्यासक्रम प्रशिक्षण संदर्भात ,ओमप्रकाश अग्रवाल हायस्कुल ,अंजुर फाटा येथे प्रशिक्षणाला पाठवले होते.तसेच सन २०१४-१५ वज्रेश्वरी न्यू इंग्लिश स्कुल वज्रेश्वरी इयत्ता ६ वी. ई.या वर्गाचे  क्लास टीचर म्हणून कामकाज पाहिले त्याचे रिझल्ट(गुणपत्रक) उपलब्ध आहेत.सन २०१५-१६ रेणुका विद्यालय झिडके इयत्ता ५ वी ब चा क्लास टीचर असताना त्याचे गुणपत्रक आहेत.रेणुका विद्यालय झिडके येथे इयत्ता ८ वी क चे गुणतक्ते आहेत .एस.एस.सी परीक्षा मार्च २०१४ ते २०१५ सुपरवायझर वायझर म्हणून कामकाज पाहिले आहे.



जि. प.ठाणे येथील शिक्षणाधिकारी याच्या आवक नोंदमध्ये यदुनाथ कोदे यांचा प्रस्ताव गेल्याची नोंद आहे.शिक्षक पदाच्या कायम नोकरीसाठी संस्थेला २०१६ पासून अर्ज केले आहेत.सन २०१४-१५,२०१५-१६ व २०१६-१७ टाचण वह्या आहेत.सन २०१४ ला मुख्याध्यापकाने दिलेले पत्र आहे.सन २०१६-१७ आठवी क चा क्लास टीचर म्हणून कामकाज पाहिले आहे.सन २०१६-१७ इयत्ता ९ वी व १० वी चे वर्ग शिकवलेत त्याचे कोदे यांच्याकडे टाचण आहेत.सहशिक्षक म्हणून बिनपगारी नोकरी करीत असताना कोदे यांना कायम शिक्षक पदासाठी शिक्षण संस्थेने डावल्याचे उघडपणे स्पष्ट झाल्याने वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. 'शिक्षण संस्थेने माझ्यासारख्या अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस न्याय दिला नाही तर संस्थेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार" असल्याचा इशारा अन्यायग्रस्त शिक्षक यदुनाथ कोदे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...