भिवंडीत २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना चिमुरडीने वाढदिवसानिमित्त वाहिली आदरांजली 


भिवंडी: शिवसेना युवासेनेचे उपतालुकाप्रमुख तथा समाजसेवक कल्पेश भारत केणे यांनी सामाजिक संदेश देत आपली मुलगी विरा कल्पेश केणे हिचा ५ वा वाढदिवस २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना अभिवादन करून साजरा केला.यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना आदरांजली अर्पण केली. 


भिवंडी पोलिस ठाण्याच्याच्या सर्व पोलिसांचे मनोधर्य वाढावे यासाठी पोलिसांना गुलाबाची फुले व मास्क वाटप केले तसेच २६ बिसलेरी पाण्याचे बॉक्स उपलब्ध करण्यात आले.यावेळी पोलिसांकडून विराचे अभिनंदन करण्यात येऊन तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी विराचे वडील कल्पेश केणे,काका राजेशकेणे व समाजसेवक सुनील केणे व विग्नेश केणे उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...