इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशन'तर्फे आदिवासी पाड्यात मदतीचा हात

 जेबीसीएन शाळेतील विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी 



खर्डी : हिसर येथील जेबीसीएन शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या मदतीच्या सहभागातून कसारा जवळील पेठ्याचापाडा या आदिवासी वस्तीत पोहचून मुंबईस्थित इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशननेे तिथल्या ९२ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू,मास्क व वयोवृध्दांसह तरुणांना कपडयाचे वाटप केले.


सर्वत्रच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गोरगरिबांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यामुळे रोजच्या पेटणाऱ्या चुलीची भ्रांत पडून मोलमजुरी करणाऱ्यांचे हाल सुरु आहेत.मात्र याही परिस्थितीमध्ये सामाजिक भान जपणाऱ्या अनेक व्यक्ती असल्याने गोरगरिबांना काही अंशी का होईना दिलासा मिळत आहे.दहिसर येथील इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्यावतीने शनिवारी पेठ्याचापाडा वस्तीतील रहिवाश्यना सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला आहे.हा उपक्रम राबवण्याकरिता जि.प.शिक्षक महेश पवार यांनी विशेष पुढाकार घेतला.यावेेेळी इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे डॉ नारायण अय्यर,अमित सरकार,आरती गुप्ता,अमित नरीअनी,जि.प.शिक्षक राजेंद्र जगताप,महेंद्र गारे,जि.प.सदस्य विठ्ठल भगत,उपसरपंच सचिन निचिते, ग्रामस्थ भावड्या धापटे आदी उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...