कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार -  जगन्नाथ  शिंदे    


राज्यात आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सुतोवाच माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले आहे .कल्याण डोंबिवली मध्ये राष्ट्रवादीला लागलेली घरघर थांबवण्यासाठी वरिष्ठांनी पुन्हा एकदा जिल्हा अध्यक्ष पदाची सूत्रे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हाती दिली.


 त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मध्ये चैतन्य निर्माण झाले आहे .संविधान दिनानिमित्त जिल्हाअध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  उद्यानात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह संविधानाचे वाचन केले .त्यानंतर २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या. पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना जगन्नाथ शिंदे यांनी संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतल्याचे सांगितले. तसेच मला पक्ष बांधणी व पक्ष विस्तारासाठी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. 


राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीतर्फे देण्यात येतील. याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेत महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड , वरिष्ठ राका प्रदेश नेता पारसनाथ तिवारी, उमेश बोरगावकर,मनोज नायर, सुभाष गायकवाड, श्याम आवारे, रामदास पाटील, शरद गवळी, प्रशांत माळी, योगेश माळी, रेखा सोनवणे, अनिल करपे, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...