शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती उत्साहात साजरी



ठाणेः शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५१वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरूनानक जयंतीनिमित्त ठाण्यातील गुरूद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. इतर उत्सवांप्रमाणेच गुरूनानक जयंतीवरही कोरोनाचं सावट होतं. गुरूनानक साहेब यांचा जन्म कलवंडी इथे झाला. आता हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे. गुरूनानक जयंतीनिमित्त गुरूद्वारामध्ये गुरू ग्रंथ साहेबचं पठण तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं होतं.


गेल्या तीन दिवसांपासून शीखांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या गुरू ग्रंथ साहेब या ग्रंथाचं अखंड वाचन केलं जात होतं. १४३० पानांच्या या ग्रंथात हिंदूंचे १३, शीखांचे ७ आणि मुस्लिम धर्मियांचे ५ अध्याय आहेत. संत रामदास स्वामी, संत नामदेव, संत कबीर या संतांच्या रचनांचा यात समावेश आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...