भिवंडीत फेसबुकवरील अमेरिकन मैत्रणीने संपादक मित्रालाच घातला गंडा ; गुन्हा दाखल
भिवंडी: एका संपादकाला फेसबुकवरील अमेरिकन तरुणीशी मैत्री चांगलीच महागात पडल्याची घटना घडली आहे.हि घटना भिवंडी शहरातील कामतघर चंदनबाग परिसरात राहणाऱ्या एका साप्ताहिकाच्या संपादकासोबत घडली आहे.संतोष जानू चव्हाण (४२) असे फसवणूक झालेल्या संपादकाचे नाव आहे.या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अमेरिकन मैत्रिणीसह तिच्या साथीदारावर भांदवी. ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोज अँड्रीया असे गुन्हा दाखल झालेल्या अमेरिकन मैत्रणीचे नाव आहे. या दाखल गुन्हयाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
फेसबुकवर चार वर्षापासून आरोपी रोज अँड्रीयाशी मैत्री :
भिवंडी शहरातुन प्रसिद्ध होणाऱ्या एका साप्ताहिकाचे संतोष चव्हाण हे संपादक आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी अमेरिकेत राहणारी आरोपी रोज अँड्रीया हिच्या सोबत फेसबुकवरून संतोष यांची मैत्री झाली होती. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी संतोष यांनी काही कारणावरून अचानक तिचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले होते. त्यामुळे दोघांच्या मैत्रीचा संपर्क तुटला होता. मात्र काही महिन्यापूर्वी आरोपी रोज अँड्रीया हिने पुन्हा संतोषशी गोड गोड बोलून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पुन्हा मैत्री केली.
पुन्हा मैत्रीचा सिलसिला दोघांमध्ये सुरु झाला,अन..
फेसबुकवरच पुन्हा दोघांमध्ये मैत्रीचा सिलसिला सुरु झाला आणि याचाच फायदा आरोपी रोज उचलत एके दिवशी संतोषला मी तुझ्यासाठी अमेरिकेतून काही वस्तू पाठवल्या आहे. असा संतोषच्या फेसबुकवर अंकाऊंटवर तिने मॅसेज पाठवला. त्यांनतर २ जुलै ते ७ जुलै २०२० या कालावधीत दोघांमध्ये फेसबुकवरच या विषयी चर्चा करून एक खूपच महागडी घडी, एक मोबाईल आणि बूट आणि इतरही वस्तू पाठवल्याचे तिने सांगत या वस्तूचे फोटो फेसबुकवर शेअर केले. त्यामुळे यासर्व वस्तू तुम्ही दिल्ली कस्टम ऑफिसमध्ये रक्कम भरून सोडवून घ्यावी असे सांगितले. मात्र हे सोडविण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही असे संतोषने तिला सांगताच तिने अमेरिकन डॉलर पण पाठवल्याची संतोषला थाप मारली. यामुळे तिच्या बोलण्यावर संतोषचा विश्वास बसला. आणि त्यांनी दिल्लीच्या कस्टम ऑफिसमध्ये ३७ हजार ५५० रुपये कस्टम ड्युटी भरण्याची तयार झाले. त्यांनतर आरोपी रोज ने दिलेल्या दिल्ली कस्टम ऑफिसचा मोबाईल नंबर आणि बँक अकांऊंड नंबर दिला. त्यानुसार संतोष यांनी त्या मोबाईलवर संपर्क साधून तुम्ही माझ्या नावाचे पार्सल मुंबई कस्टम ऑफिसमध्ये पाठवा. मी येथूनच सोडवून घेईल. मात्र त्या अनोखळी मोबाइलधारकाने तुम्हाला दिल्लीतीलच बँक अकांऊंड नंबरवर रक्कम वर्ग करावी लागले. असे सांगितले. त्यांनतर भिवंडीतील त्यांच्या बँक खात्यातून त्यांनी ३७ हजार ५५० रुपये तिने दिलेल्या बँक अकांऊंड नंबरवर वळते केले.
ठकसेन अमेरिकन मैत्रीणने फेसबुक अकाऊंड केला ब्लॉक
अमेरिकन मैत्रिणीने दिलेल्या बँक अकांऊंड नंबरवर रक्कम जमा झाल्याचे फेसबुक वरून संतोष यांनी तिला मॅसेज दिला असता तिने मात्र रिपलाय दिला. त्यामुळे संतोष यांनी तिला फेसबुकवर वारंवार संपर्क साधत असतानाच संतोष यांच्या फेसबुक अकाऊंडला तिने ब्लॉक केले. त्यांनतर कस्टम ड्युटी भरूनही चार महिने उलटून गेले तरीही रोज ने आपल्याला पाठवलेल्या वस्तू मिळत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ठकसेन अमेरिकन मैत्रीण रोज व तिच्या एका अनोखळ्या साथीदारावर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती कारवार करीत आहेत.