उपेक्षा भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टिटवाळा रेल्वे स्टेशनचा कायापालट
टिटवाळा : माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि खासदार कपिल पाटील यांच्यामुळे टिटवाळा रेल्वे स्टेशन कायापालट होताना दिसत आहे.मागिल पाच वर्ष नागरिकांच्या समस्या, शहराची वाढती लोकसंख्या,रेल्वे स्टेशनवर येणारा ताण,एकच पादचारी पुल ई.चा विचार करुन सातत्याने खासदार कपिलजी पाटील यांच्याकडे,रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. खा.कपिल पाटील यांनी सुध्दा रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून पादचारी पूल व बरीच कामे मंजूर केली आहेत. रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेल्या बऱ्याच स कामांना सुरुवात झाली आहे.
या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आज दि.२५/११/२०२० रोजी संध्याकाळी ५.३०वा. मा.श्री.कपिल पाटील साहेब (खासदार भिवंडी लोकसभा)टिटवाळा शहरात आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.टिटवाळा रेल्वे स्थानकावरील नागरिकांना सुरक्षित रित्या ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले असून नागरिकांनी त्याचा उपयोग सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे.नागरिकांच्या मागणी नुसार कसारा च्या दिशेने असणारा पादचारी पूल सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून मंजूर करून घेण्यात आला आहे. लवकरात लवकर त्याचे सुद्धा काम पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सेवेसाठी उपयोगात येईल या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी व टिटवाळा शहरातील ईतर ही समस्या जाणून घेण्यासाठी आज खासदार श्री.कपिल पाटील साहेब यांनी टिटवाळा शहराला भेट दिली.
नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेकडे ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून सतत पाठपुरावा करून मागणीनुसार दोन्ही पादचारी पूल मंजूर करून घेऊन त्यात दोन्ही पादचारी पूल तयार होऊन नागरिकांच्या सेवेत हजर झाला आहेत.अखेर नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या गेल्या ४ /५ वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे या वेळी मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते