शिवभक्त आदिवासी आश्रमशाळेचा नवा उपक्रम..


कोरोनाच्या महामारीत मार्च पासुन शाळा बंद आहेत.या कालावधीत आश्रमशाळेतील दर्‍या खोर्‍यात राहणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांशी संपर्क होत नव्हता.नवीन शैक्षणिक वर्षात शासनाने आँनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरु केली यामुळे आमच्यापुढे मोठे संकट उभे राहिले.पालकांकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यांशी संपर्क साधने कठीण झाले होते.काही माझे शिक्षक आदिवासी वाड्यांवर जाऊन शिकवत होते.पंरतु त्यातही अनेक अडचणी उदभवत होत्या.अशावेळी कमीत कमी दहावीच्या विद्यार्थ्यांना आँनलाईन प्रक्रियेत आणण्यासाठी मोबाईलची आवशक्यता होती.प्रत्येक मुलाला मोबाईल देणे गरजेचे होते.अशावेळी अनेकांशी संपर्क साधला व याकामी यश आल.सत्य साई विद्यावाहिनी या ट्रस्ट ने ५७ मोबाईल दिले .त्यामुळे ई.१० चे विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत भाग घेऊ लागले. 


शिक्षणापासुन वंचित असलेले विद्यार्थी आँनलाईन शिक्षणात भाग घेउ लागले.सर्व मुल आनंदाने सहभागी होतात.माझे सर्व शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवत असतात.दररोज वेळापत्रकानुसार अध्यापणाचे कार्य चालु आहे.शासनाने सुट्टी देऊनही आम्ही फक्त चारच दिवस सुट्टी घेतली व आँनलाईन तासिका सुरु झाल्या आहेत.मुलांना अभ्यासासाठी मोबाईल मिळाल्यामुळे माझा आदिवासी पालक अतिशय खुष आहे त्यानाही आता शिक्षणाच महत्व पटु लागले आहे.याकामी सत्य साई विद्यावाहिनीचे फार मोठे योगदान आहे.तसेच मुख्याध्यापिका सौ.सायली बुटेरे व सर्व शिक्षक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...