ज्या क्षेत्राची आवड असेल तेच करियर निवडा- नवनाथ ढवळे (उपविभागीय पोलीसअधिकारी)
शहापुर : आगामी होणाऱ्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर भानुदास भोईर व भास्कर भोईर यांच्या संकल्पनेतुन पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ सोमवारी शहापुरातील म.ना.बरोरा माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व तरुण, तरूणींना मार्गदर्शन करतांना शहापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्याला ज्या क्षेत्राची आवड असेल तेच क्षेत्र व करियर निवडावे.तसेच स्वतःशी प्रामाणिक राहून सकारात्मक दृष्टीकोन असावा. अभ्यास करताना खचुन न जाता संयम व आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे सांगून स्पर्धा परीक्षेसाठी पाचवी ते बारावी पर्यतच्या पुस्तकांचा बेसिक अभ्यास महत्वाचा आहे. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांशी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सवांद साधला.
उपस्थित मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, रमेश वनारसे, ऍड.दिवाणे, अनिल निचिते आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना व तरुण, तरूणींना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तर प्राचार्य दत्तात्रय किरपण यांनी मार्गदर्शनात सांगितले की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या बॅनरवर झळकू नका असा सल्ला देऊन उत्तम व कणखर असे मोलाचे मार्गदर्शन केले. या समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी आयोजकांकडुन मार्गदर्शन पुस्तक शेकडो विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजक भानुदास भोईर (संचालक दि मुन्सीपल को-ऑप. बँक ली मुंबई), व भास्कर भोईर (सचिव स्थानिक लोकाधिकार समिती, भविष्य निर्वाह निधी कार्यालय ठाणे),यांचे अभिनंदन व कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यकमाचे प्रास्ताविक भास्कर भोईर यांनी तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मुकेश दामोदरे यांनी केले. तर ह्या समारंभास दिनेश घरत, केशव शेलवले आदि मान्यवर उपस्थित होते.