उल्हासनगरातील बटरफ्लाय गार्डनमध्ये १०९ प्रजातींचे फुलपाखरू उडणार..
ठाणे जिल्ह्यातील पहिला उपक्रम...
उल्हासनगर: बटरफ्लाय गार्डन हा ठाणे जिल्ह्यातील पहिला उपक्रम उल्हासनगर मधील सपना गार्डनमध्ये राबवण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.गार्डनमध्ये १०९ प्रजातींचे फुलपाखरू,भवरे उडताना दिसणार असून रात्रीच्यावेळी काजवे व जुगनू चमकणार आहेत. यासाठी पुढाकार घेणारे भाजपा नगरसेवक मनोज लासी यांनी ही माहिती दिली.अवघ्या १३ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात वसलेल्या उल्हासनगरात मोजकेच गार्डन बगीचे असून त्यात सर्वाधिक लोकप्रिय सपना गार्डन आहे.याच गार्डनमध्ये मनोज लासी यांच्या प्रयत्नाने आय लव उल्हासनगर हा सर्वात लांब अंतराचा इलेक्ट्रॉनिक फ्लेक्सीबल तयार झालेला असून सेल्फीसाठी तो आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे.
मनोज लासी आणि नीटस ( nitus ) या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.नीटस संस्थेचे अध्यक्ष डॉ.वरतगिरी हे शास्त्रज्ञ असून ते पर्यावरण संवर्धनाचे काम करीत असतात.त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे , मुंबई, नाशिक व अनेक ठिकाणी बटरफ्लाय गार्डन सारखे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.याच संस्थेने नाशिक शहराजवळ एका विस्तीर्ण जागेत काजव्यांचे गार्डन विकसित केले आहे.रात्रीच्या वेळेस शेकडो काजवे या ठिकाणी तेजोमय होतात एक विलोभनीय दृश्य बघायला मिळते. ठाणे जिल्ह्यातील बटरफ्लाय गार्डन हा पहिला उपक्रम असून लासी यांच्यासोबत डॉ.वरतगिरी व त्यांच्या ५सहकाऱ्यांनी सपना गार्डनची पाहणी केली आहे त्यानंतर या गार्डनची एक ठराविक जागा बटरफ्लाय गार्डन निश्चित केली आहे .
या संदर्भात माहिती देतांना नगरसेवक मनोज लासी म्हणाले की उल्हासनगरचे सपना गार्डन हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे, शेकडो नागरिक येथे जॉगिंग, योगा व व्यायामासाठी येतात.येथे बटरफ्लाय गार्डन होणार असल्यामुळे ते एक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.फुलपाखरूंचे विविध प्रकारचे आकर्षक रंग बघून एक चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे बटरफ्लाय गार्डन हे आरोग्यासाठी टॉनिक ठरणार आहे. या गार्डनसाठी आमदार निधी किंवा मनपाचा निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व लवकरच हा उपक्रम पूर्ण होईल अशी अपेक्षा मनोज लासी यांनी व्यक्त केली आहे .