भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी गोरखनाथ पाटील यांची नियुक्ती 



भिवंडी : आगामी विविध स्तरावरील सार्वत्रिक निवडणुकींची रणधुमाळी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली असून त्यामध्ये भाजप अंतर्गत कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळावे यासाठी कार्यकर्त्यांच्या विविध पदांवर नेमणुका केल्या जात आहेत.त्यानुसार भाजपचे युवा नेते तथा गाणे - फिरिंगपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोरखनाथ मोतीराम पाटील यांची भाजपा किसान मोर्चा भिवंडी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


ही नियुक्ती एका कार्यक्रमात खासदार कपिल पाटील व आमदार तथा भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष किसन कथोरे यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.गोरखनाथ पाटील यांची किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी पुनर्रर्र नियुक्ती झाली आहे.त्यामुळे त्यांचे भाजप नेते प्रकाश पाटील ,रमाकांत नांदूरकर, नारायण पाटील,महेंद्र म्हात्रे ,रामनाथ पाटील, विजय मुकादम ,वसंत पाटील,वामन धिंडा,अरूण जाधव ,शरद भोईर आदींसह भाजप वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.


दरम्यान भाजपच्या किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती होताच गोरखनाथ पाटील यांनी सांगितले की आपण भविष्यात शेतकरी, कृषी तसेच गांव पातळीपासून भारत देश आत्मनिर्भय बनण्यासाठी युवकांच्या सोबतीने विशेष प्रयत्न करणार असून भाजपची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...