आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने धर्मवीर आनंद दिघेसाहेब उड्डाणपूल जनतेसाठी खुला
कल्याण :राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून MMRDA अंतर्गत ४.३५ कोटी निधी मधून मंजुर करून घेतलेल्या कल्याण पूर्व व कल्याण पश्चिमला जोडणारा आई तिसाई देवी उड्डाण पुल (पत्रीपूल) नंतर दुसरा पर्यायी रस्ता असलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाणपूल ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वालधुनी, एफ कॅबिन रोड रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे आज लोकार्पण करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाणपूलावर पडणाऱ्या खड्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी या पुलावर मास्टिक करण्याबाबत महानगपालिकेस पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता त्यानुसार या पुलावर मास्टिक करण्यात आले. या रस्त्यामुळे कल्याण पूर्व-पश्चिमेला येण्या जाण्यासाठी वाहन चालकांना होणाऱ्या त्रासातुन सुटका होणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे, महिला जिल्हा अध्यक्षा रेखा चौधरी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय, कल्याण पूर्व महिला मोर्चा अध्यक्षा प्रिया जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.सत्येद्र दुबे, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष नितीन शिंदे, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष श्री.प्रविण तिवारी, माजी परिवहन सभापती, श्री.सुभाष म्हस्के, श्री.लक्ष्मण आंबोकर, रवी हराळे, सौ.अर्चना नागपुरे तसेच भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.