युवतींसाठी मोफत लाठीकाठी व आत्मसंरक्षण शिबीर संपन्न.. 


 मुरबाड : दि.२७,२८,२९ नोव्हेंबर २०२० रोजी  महाराष्ट्र युवा संघ कल्याण संलग्न - नेहरू युवा केंद्र ठाणे, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ड्रॅगन इंडियन कराटे वेलफेअर असोसिएशन मुरबाड यांच्या संयोजनाने आणि  मुरबाड तालुका युवा व क्रीडा मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने शांताराम भाऊ घोलप सभागृह काँग्रेस भवन, बाजारपेठ  मुरबाड येथे यशस्वी रित्या संपन्न झाला. आज समाजातील  अनेक तरुणी  अन्याय  ,अत्याचाराला बळी पडत आहेत . त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करुन ,स्वसंरक्षण कसे करावे तसेच त्यांच्यात आत्मनिर्भयता निर्माण व्हावी हा या शिबिराचा उद्देश आहे. या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 



यावेळी ॲडव्होकेट मा. अशोक फनाडे - सचिव-शांताराम भाऊ घोलप सभागृह काँग्रेस भवन मुरबाड,मा.  लक्ष्मण घागस सर अध्यक्ष, ड्रॅगन इंडियन कराटे वेल्फेअर असोसिएशन मुरबाड,मा. सौ. शीतल तोंडलीकर माजी नगराध्यक्षा  मुरबाड नगरपंचायत, डॉ.स्वप्नील वाघचवडे -  वैद्यकीय अधिकारी ग्रामिण रुग्णालय मुरबाड , डॉ. सौ.स्नेहल वाघचौडे  स्त्री रोग तज्ज्ञ ,  दिलीप घोरड सामाजिक कार्यकर्ते,अजित कारभारी अध्यक्ष महाराष्ट्र युवा संघ व राज्य युवा पुरस्कारार्थी प्रशिक्षक वसंत जमदरे सचिव-ड्रॅगन इंडियन कराटे वेल्फेअर असोसिएशन,कु.ज्योती खरे -मुरबाड तालुका युवा‌ व क्रीडा मंडळ,कु.हर्षदा जाधव ,नेहरू युवा साथी, कीर्ती कुरबेट, पूनम कासलेमहाराष्ट्र युवा संघ सदस्य)उपस्थित होते, तसेच एकुण  ६५ प्रशिक्षणार्थी  युवतींनी या  शिबीरात सहभाग घेऊन त्यांना  नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार) कडून प्रमाणपञे  प्रदान करण्यात आली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...