पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

इमेज
अंबरनाथ: कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने पसरू लागला आहे, त्यामुळे राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागू केलेली रात्रीची संचारबंदी अंबरनाथमध्ये लागू करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.  अंबरनाथमध्ये आज २२ डिसेंबर २०२० पासून ५ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, या निर्णयामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत बंद रहाणार असून याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी केले आहे.

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...

इमेज
करोडो रूपयांची उलाढाल होणार ठप्प... मुरबाड : दोनशे वर्षांची परंपरा आसलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठो म्हसा यांत्रा या वर्षी रद्द करण्यात आल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. यातल्या रद्द झाल्याने करोडो रूपयांच्या उलाढालीचा ब्रेक लागणार आहे.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावी ही यात्रा ही यात्रा भरत असते. ही यात्रा सलग १५ दिवस सुरू रहाते असल्याने करोडो रूपयांची उलाढाल होत असते. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भोठ्या प्रमाणात व्यापारी या ठिकाणी येत असतात.  या यात्रेत हवेसे,नवशे गवसे यांच्या साठी पर्वणी असते. बैलगाडीच्या शैरती साठी लागणारे खिल्लारी बैल या यात्रेत खरेदी विक्री होत असल्याने बैल बाजारात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. ही यात्रा थंडीच्या महिन्यात सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात ब्लॅकेट व चादरींची  विक्री होत असते.  ही यात्रेत म्हसोबा देवाला केलेले नवस फेडण्यासाठी व नव्याने नवस करण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात.  या ठिकाणी नवस फेडण्यासाठी म्हणजे गळ लावण्यासाठी भाविकांची गर्दी असते. गळ लावणे म्हणजे केलेला नवस...

TVs चांपियन बाईक स्पर्धेत जागृती पेणकर प्रथम

इमेज
सरळगाव : TVs  चांपियन स्पर्धेत कल्याण येथील जागृती पेणकर या युवतीने प्रथम क्रमांक पटकावल्याने तीचे सर्वच थरातून कौतूक होत आहे. ठाणे,पालघर जिल्हा वैश्य समाजाच्या कमीटीवर चिटणीस पदी कार्यरत असलेले किरण पेणकर यांची जागृती कन्या आहे.   वैश्य समाजात ठाणे, पालघर , रायगड,मालवण - सिंधुदुर्ग जिल्ह्यात  या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी जागृती ही एकमेव  स्पर्धक ठरली आहे.   या स्पर्धेसाठी भारतातून ३७ मुलीं स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या . त्यामधून १६ मुलींची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली होती. या १६ मुलींमध्ये खडतर अशा ४ फायनल घेण्यात आल्या. या चारी फायनल मध्ये जागृती हीने प्रथम, क्रमांक मिळवून आपला स्थान टिकवून ठेवले होते. अखेर १९ डीसेंबर २०२० रोजी झालेल्या चांपियन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उत्तम बाईक रायडर्स होण्याचा मान मिळवला.हा मान मिळवल्याने तिचे वैश्य समाजा बरोबरच महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.  Tvs कंपनीच्या वतीने २५ हजार रूपये रोख व TVs ची स्पोर्ट्स बाईक गाडीची चावी प्रधान केली.  "मला बाईक चालवण्याची लहानपणा पासून हाऊस  होती. ब...

जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

इमेज
ठाणे: जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पुर्वतयारी करण्यात आली असुन यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहे.  तसेच पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.लस उपलब्धता झाल्यानंतर तातडीने मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात  आयोजित कोरोना लसीकरण टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, डॉ. विनायक जळगावकर, जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सुमारे ८५० लसीकरण केंद्र  असणार आहेत.  दर दिवशी १०० लस देणार आहेत. यानुसार एका दिवशी ८,५०० जणांना लस देण्यात येईल. यापद्धतीने नियोजन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. कोरोनाची लस येताच योग्य त्या तापमानात ठेवून ही लस लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. ग्रामीण भागातही या लसचं वितरण करण्यात येणार आहे. या लसची साठवणूक, त्याचे नियंत्रण व वितरणाच्या वेगवेग...

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

इमेज
मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीस बोलत होते. काही निवडणुकांमध्ये इकडे तिकडे झाले म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे, जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी निवडणुकीत सोबत यावे (त्यांनी एकत्र निवडणूक लढवावी) ही तर आमची इच्छा आहे.ते सोबत आल्यामुळे त्यांना स्पेस उरणार नाही. एखाद्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तर चिंता करायचे कारण नाही. या तिन्ही पक्षाने आपल्या संधी दिली आहे जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू. भाजपचे आमदार आमच्याकडे येणार अशा वावड्या ते उठवत राहतात. पण कुणीही जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात. या देशाचा वर्तमान आणि भविष्य हे...

पडघ्यात अवैध खैर साठ्यावर वनविभागाची धाड : सोलीव खैराची ५९ ओंडकी जप्त

इमेज
पडघा: भिंवडी तालुक्यातील पडघा वनपरीमंडळातील दुर्गम भागात असलेल्या एका गावात अवैधरीत्या दडवुन ठेवलेल्या खैर साठ्यावर वनविभागाने धाड टाकून सोलीव ५९ खैराची ओंडकी जप्त केल्याने खैर तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.  पडघा पाच्छापुर रस्त्यालगत असलेल्या राहुर - सावरोली गावादरम्यान एका शेतात मोठ्या प्रमाणात खैराची ओंडकी दडवून ठेवल्याची खबर वनविभागाला मिळताच पडघा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, वनपाल डी. बी माळी, ए. एस. काटेस्कर, वनरक्षक बी. एन. आंबुलगेकर, एस. एन. चिपळूणकर, एस. शेलार, प्रमोद सुतार, विष्णु अस्वले, अजय राठोड, संदीप पाटील, शरद माढा, वनमजूर भगवान सवर, कार्यालयीन कर्मचारी महेंद्र भेरे चालक विकास उमतोल या वनविभागाच्या पथकाने या ठिकाणी सोमवारी धाड टाकून सोलीव खैराची २.५० लाख रुपयांची ५९ ओंडकी जप्त करून ताब्यात घेतली आहेत.

भिवंडीतील खासगी कर वसुलीचा ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

इमेज
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे.मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.यावेळी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील पालिका आयुक्तांकडे सादर केले. दरम्यान आंदोलनादरम्यान आपण पालिका आयुक्तांची भेट घेतली असता सदरचा ठराव अजून माझ्यापर्यंत मंजुरीसाठी आलेला नाही.सदर ठराव माझ्याकडे आल्यानंतर त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जातील जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मंजुरी देणार नाही असे आश्वासन आम्हाला पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिले असून जोपर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर...

कोरोना काळात जबाबदारी झटकणाऱ्या आरटीओतील ८ लिपिकांच्या चौकशीचे परिवहन आयुक्तांचे आदेश

इमेज
ठाणे परिवहन विभागात खळबळ भिवंडी :  कोरोना (कोव्हिड-१९) या संसर्गजन्य रोगाला जागतिक महामारी घोषित करण्यात आली आहे.या कोरोना कालावधीत संपूर्ण शासकीय,निमशासकीय यंत्रणा जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात असताना व सर्व शासकीय निमशासकीय ,कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी (कोव्हीड-१९) सज्ज असतांना ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ८ लिपिक मात्र त्यांची जबाबदारी झटकून अनधिकृतपणे कर्तव्यावर गैरहजर राहिले होते.या गैरहजर कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होणेसाठी राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष  शरद धुमाळ यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग यांच्याकडे तक्रारी निवेदन सादर केले होते.शरद धुमाळ यांच्या तक्रारीची परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना दिले होते त्यानुसार सदर ८ लिपिकांची चौकशी परिवहन आयुक्तांनी सुरू केली आहे.  याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की,ठाणे आरटीओ येथील सर्व कर्मचारी कोरोना काळात नागरिकांना वाहन विषयक सेवा सुविधा देत असतांना विकास परबत, गीता लोके, बालाजी हटकर, स्वप्निल शेळ...

१८ गावांबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

इमेज
कल्याण : राज्य शासनाने वगळलेली १८ गावे केडीएमसीमध्ये पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची मागणी २७ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राज्य शासनाने मार्च महिन्यात २७ गावांपैकी १८ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात राजकीय पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर नुकताच निर्णय झाला असून वगळलेली ही गावे पुन्हा केडीएमसीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मात्र हा निर्णय घेताना २७ गावातील नागरिकांच्या निवेदनाचा कोणताही विचार झाला नसल्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदें यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावेळी सांगितले. तसेच २७ गाव आणि संघर्ष समितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मा...

ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना मोफत ३५ लाखाचा अपघाती विमा

इमेज
टीजेएसबी बँकेकडून शिक्षक संघटनांची मागणी मान्य ठाणे:  ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारता ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) ३५ लाखाचा अपघाती विमा घोषित केला आहे. याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शिक्षकांना होणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी सांगितले. टीजेएसीबी मध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील ५ हजाराहून अधिक शिक्षक खातेदार असून शिक्षकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी काल बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अधिकारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली  या बैठकीला भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी अनिल बोरनारे, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे, ठाणे संयोजक संदीप कालेकर, शिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश मदने व पदाधिकारी राम पिसाट, विजय कोल्हे, संतोष बुवा आदी पदाधिकारी व टीजेएसीबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील साठे, सरव्यवस्थापक स्वप्नील जांभूळे, व्यवस्थापक प्रसाद मथुरे  उपस्थित होते.अपघात...

७४ वर्षांनंतर गरेलपाडा गावात वीज पोहचली...

इमेज
शहापुर : तालुक्यातील गरेलपाडा गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षांनंतरपहिल्यांदाच वीज पोहचली आहे. ही अत्यावश्यक असणारी सुविधा शहापूर उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता अविनाश कटकवार यांच्या उत्तम नियोजनामुळे साध्य झाल्याने सर्वथरांतून महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने चंद्र आणि मंगळापर्यंत झेप घेतली असली तरी एखाद्या  एखाद्या गावात वीज पोहोचवण्यासाठी ७४ वर्ष लागतील असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. मात्र अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच  वीजेचा प्रकाश मिळण्यासाठी शहापूर तालुक्यातील गरेलपाडा गावाला  तब्बल ७४ वर्षे वाट पहावी लागली. तर गावात वीज नसल्याने अनेक अचडणींना सामोरे जावे लागत असल्याने गावातील विद्यार्थ्यांना रात्री दिव्याच्या अंधारातच अभ्यास करावा लागत होता. अनेक वर्षे अनेक तांत्रिक अडचणीमुळे सदर काम रखडले होते. त्यातच महावितरणचे उपकार्यकरी अभियंता अविनाश कटकवार  यांनी सदर अडचणी दूर करून उत्तम नियोजनकरून तानसा तलावाच्या विसर्गात व्यापलेल्या गरेलपाडा येथे वीज पोहचविण्यासाठी  ३ किलोमीटर एच टी लाईन तसेच १.३५ किलोमीटर एल टी ल...

"निसर्ग मित्र बंधारा" पोर्टेबल फोल्डिंगचा अनोखा बंधारा विकसित

इमेज
 बदलापूर :  पावसाळ्यानंतर वाहणारे पाणी अडवून ते जास्तीत जास्त जमिनीत जिरविण्यासाठी बदलापूर जवळील बेंडशिळ या गावातील ओढ्यावर फोल्डिंगचा पोर्टेबल असा बंधारा विकसित करण्यात आला असून तो खऱ्या अर्थाने "निसर्गमित्र" बंधारा ठरत आहे. कृषिभूषण राजेंद्र भट यांनी हा बंधारा विकसित केला आहे. भट यांनी  जल संचयनासाठी ‘निसर्गमित्र' बंधाऱ्यांची साखळी तयार केली असून त्यामुळे बेंडशीळच्या ओढ्यात लाखो लिटर पाणी साठून ते जमिनीत जिरवले जात आहे.पावसाळ्यानंतर वाहून जाणारे ओढ्या-नाल्यांचे पाणी अडविण्यासाठी उभारण्यात येणारे  बंधारे  हे तीन ते सहा महिने उभारायचे असल्याने तितक्या काळापुरते प्रवाहात बांध घालून पुन्हा काढून ठेवता येतील, अशा पोर्टेबल फोल्डिंगच्या बंधाऱ्यांचा यशस्वी प्रयोग अंबरनाथ तालुक्यातील बेंडशीळ येथील ओढ्यावर करण्यात आला आहे. बेंडशीळ गावाबाहेरून वाहणाऱ्या या ओढ्यावर प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण राजेंद्र भट यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी एक बंधारा बांधला आहे. त्याच ओढ्यावर आता आणखी ‘निसर्गमित्र' नामक नवे दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राजेंद्र भट यांन...

कोरोना काळात कल्याण डोंबिवलीत खासगी डॉक्टरांनी दिलेलं योगदान खूप मोठं - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

इमेज
 कल्याण  : देशाच्या कोणत्याही शहरात जे काम झालं नाही ते कल्याण डोंबिवलीमध्ये खासगी डॉक्टरांनी इकडे करून दाखवले आहे. कोरोना काळात कल्याण डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांनी खूप मोठं योगदान दिल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काढले. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे रक्तदान शिबिर आणि कोवीड काळात उल्लेखनीय सेवा दिलेल्या डॉक्टर आर्मीच्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही कौतुकाची थाप दिली.  कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या आयएमए, नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन, कल्याण ईस्ट मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ, होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन, युनानी आदी संघटना कल्याण डॉक्टर आर्मीच्या एका छताखाली एकत्र आल्या. या खासगी डॉक्टरांनी कोणतेही मानधन न घेता, वैयक्तीक अपेक्षा न ठेवता आणि विशेष म्हणजे कोवीडच्या पहिल्या दिवसापासून आपल्या जीवाची पर्वा न करता कल्याण डोंबिवलीमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्यानेच इथला मृत्युदर संपूर्ण राज्यात सर्वात कमी राहिल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी सा...

देशातील असंख्य सौंदर्यवतींवर मात करत उल्हासनगरच्या सौंदर्यवती बनल्या मिस आणि मिसेस इंडिया

इमेज
खुशबू सेवानी मिसेस इंडिया;गजनंदिनी गिरासे मिस इंडिया उल्हासनगर : देशातील असंख्य सौंदर्यवतींवर मात करून उल्हासनगरातील खुशबू शेवानी या महिलेने मिसेस इंडिया व महाविद्यालयीन विद्यार्थीनी गजनंदिनी(गौरी)गिरासे हिने मिस इंडियाचा सरताज पटकावला आहे.शहराच्या शिरपेचात दोन्ही सरताज एकाच दिवशी आल्याने या दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. खुशबू अजय शेवानी ह्या महापौर महापौर लिलाबाई आशान यांच्या परिसरात राहत असून त्यांचे पती अजय शेवानी हे उल्हासनगर महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर आहेत. पती सोबतच सासरे पितांबर शेवानी,सासू राणी शेवानी मुलगी हिना व मुलगा प्रतिक यांनी स्पर्धेसाठी हुरूप दिल्याने खुशबू ह्या गेल्या ८ महिन्यापासून स्पर्धेची तयारी सुरु केली होती. गजनंदिनी (गौरी) देवेंद्र गिरासे ही कॅम्प नंबर ४ मध्ये राहत असून तिचे वडील देवेंद्र गिरासे व काका सचिन यांचे मेडिकल स्टोर्स आहे.गजनंदिनी ही डीफार्मसी मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.आजोबा नवलसिंह,आजी रत्नप्रभा,आई जयश्री,काका सचिन,काकू अर्चना यांच्या प्रेरणेमुळे गजनंदिनी ही स्पर्धेत सहभागी झाली. कोलकत्ता येथे काल शनिवारी पार पडलेल्या स्पर्धेत द...

मनसे तर्फे महिला स्वयंरोजगार सर्वेक्षण..

इमेज
घारवली चे  माजी सरपंच योगेश रोहिदास पाटील यांनी मनसे आमदार राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला स्वयंरोजगार सर्वेक्षण आयोजित करण्यात आले. उन्नती फाऊंडेशन तसेच फॅमिनी सॅनेटरी नेपकिन  तसेच महिलांसाठी वेगवेगळे दहा रोजगार कसे करता येतील या विषयी मार्गदर्शन केले. घरगुती खाद्य पदार्थ बनवणे,दिवाळी पदार्थ,पापड,लोणची,ऑरगॅनिक भाज्या विक्री, शिवणकाम,बाग शिवणे,नर्सींग कोर्स,पोल्ट्री फार्म,घरगुती अभ्यास वर्ग. सेनिटरी नॅपकिन बनवणे... असे अनेक उद्योग व्यवसाय याबद्द्दल माहिती देण्यात आली.घारवली गावातील गणेश मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्या वेळी माजी सरपंच आणि महाराष्ट्र सैनिक योगेश रोहिदास पाटील,वैशाली योगेश पाटील तसेच विधानसभा अध्यक्ष हरीश पाटील, शाखा अध्यक्ष समीर कोंढाळकर, सुदाम कळू पाटील, अस्मिता  जैस्वाल, व सायली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

माझे कुटुंब माझी जबाबदारी;कोकण भवनमध्ये कोरोना चाचणी

इमेज
नवी मुंबई : कोरोना विषाणू (कोविड-१९) संक्रमण व प्रादुर्भाव या अनुषंगाने कोकण भवन इमारतीत विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने इमारतीतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी मोफत  कोरोना विषयक (RT-PCR व  Antigen) चाचणी करण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आज दि. ११डिसेंबररोजी सकाळी ११ वा. कोकण भवन येथील महिला भोजन कक्ष, दुसरा मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव, उपायुक्त (करमणूक) श्रीम. सोनाली मुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, नायब तहसिलदार श्रीम. माधवी डोंगरे उपस्थित होत्या.दिवसभरात एकूण १३८ एवढया चाचण्या करण्यात आल्या.  त्यापैकी १३८ चाचण्या  निगेटिव्ह आल्या व एकही पॉझिटिव्ह चाचणी मिळाली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथक डॉ.तन्मय (BAMS) , डॉ.रत्नराज (BAMD/MD) यांनी यासाठी विशेष श्रम घेतले.  या शिबीरासाठी उपस्थित  महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सुरक्षितेच्या दृष्...

मुरबाड : पेट्रोल-डिझेल दरवाढ व रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्या निषेधार्थ शिवसेनेचा रास्ता रोको

इमेज
मुरबाड : केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या व भाजपार्टीचे  रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यां बाबत केलेल्या बेताळ वक्तव्याच्या निषेधार्थ आज मुरबाड तिनहात नाका येथे केंद्र सरकार विरोधात  घोषणा बाजी करत रास्ता रोको करण्यात आला.कोरोना संकटातून  भरडून निघालेली सर्वसामान्य जनता कसबसं सावरत  जगण्याचा प्रयत्न करीत असताना नैसर्गिक  संकटाने हाती आलेले भातपिक हिरावून नेले त्यात जगण्याच्या विवंचनेत असताना केंद्र सरकारने नवीन भरमसाठ पेट्रोल -डिझेल दरवाढ करून सर्वसामान्य जनतेच कंबरड मोडून काढले. केंद्र सरकार एवढ्यावरच थांबले नाही. तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात जुलमी कायदे केले या विरोधात देशभर निषेध ,आंदोलन चालू आहे.  याशिवाय भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी  प्रसार माध्यमांसमोर बेताल वक्तव्य करून  शेतकऱ्यांची टिंगलटवाळी केली. या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलने करण्यात आली.  मुरबाड तिनहात नाका येथे शिवसेनेने कल्याण -नगर महामार्ग अडवून रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला.यावेळ...

जुन्नरच्या शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवसस्थानेच सलाईनवर

इमेज
जुन्नर: जुन्नर येथील सरकारी रुग्णालयाची व तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शेजारीच निवासस्थाने देखील बांधण्यात आली,२०१६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित देखील करण्यात आली,परंतु रुग्णालयाची मुख्य इमारत व अधिकारी व कर्मचाऱ्यांची जी निवासस्थाने आहेत त्यांच्या छतांमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असे त्याचा त्रास तेथे उपचार घेणारे रुग्ण व दवाखान्यात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात होत असे.तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी जी निवासस्थाने बांधलेली आहेत त्यात देखील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत,त्या सर्व निवसस्थानांच ड्रेनेज चे पाणी जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली नसल्याने सर्व पाणी इमारतींच्या आजू बाजूला मोठ्या प्रमाणात साठून राहत आहे त्यामुळे रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, साचलेल्या घाण पाण्यावर मोठ्या प्रमाणात डास, मच्छर फिरत असल्याने तेथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना डेंगू,मलेरिया सारखे आजार होण्याची धोका निर्माण झाला आहे.कोरोना साथीचा काळ असल्याने कर्मचाऱ्यांना कामा...

दळखण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

इमेज
शहापुर: तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळखण व एएसबीबी संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालरोग, स्त्रीरोग, अस्थीरोग, दंतविकार या आजाराची नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घघाटन माजी आमदार पांडुरंग बरोरा  यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. प्रदीप नाईक, मुख्य प्रशासकीय अधिकारी ( एसएमबीटी हॉस्पिटल )यांच्या शुभहस्ते झाले.   यावेळी कार्यक्रमाप्रसंगी कोरोना काळात सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा "कोविड योद्धा"म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच या शिबिरामध्ये बालरोग, स्त्रीरोग, अस्थीरोग, दंतविकार या आजाराची नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके, मिलिंद देशमुख, शाम परदेशी, पप्पू मिश्रा, दळखण ग्रामपंचायतचे सरपंच मंगला डोके, उपसरपंच भगवान मोकाशी, ग्रामसेवक माधवी कदम, पांडुरंग मोकाशी,  नरेश जाधव, मनीष दोंदे, वैभव गंधे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

भिवंडी: कापडनिर्मिती उद्योगाला संजीवनी देण्यासाठी शासन दरबारी सर्वोतोपरी प्रयत्न करणार- आ.रईस शेख

इमेज
भिवंडी :  शहरातील कापडनिर्मिती यंत्रमाग उद्योगातील अडचणी सोडवून पुनश्चः यंत्रमाग उद्योग दमाने उभा रहावा याकरिता आ.रईस शेख यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची मंत्रालयामध्ये भेट घेवून यंत्रमाग व्यवसायाची कैफियत मांडली.शेती उद्योगानंतर सर्वांत महत्वाचा उद्योग हा कापडनिर्मिती उद्योग म्हणजेच पावरलूम आहे.सन १९३० पासून हातमाग आणि यंत्रमाग कापड तयार करण्याच्या व्यवसायासाठी भिवंडी हे शहर प्रसिध्द आहे.भारतातील एकूण २१ लाख यंत्रमागापैकी एकट्या भिवंडी शहरामध्ये सुमारे ७ लाख पावरलूम कार्यरत आहेत.देशामध्ये कापडनिर्मिती उद्योगाकरिता भिवंडी हे शहर पूर्वी प्रथम तर आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.त्यामुळेच भिवंडीला पावरलूम सिटी संबोधिले जाते. या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत निरनिराळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित व अस्थलांतरीत कामगार- मजूर हे भिवंडी शहरामध्ये रोजी रोटीसाठी येऊन राहत आहेत.परंतू गेल्या १० वर्षांतील शासनाच्या उदासीन आर्थिक धोरणांमुळे तसेच निर्यात घसरणीमुळे या कापडनिर्मितीच्या व्यवसायाचे फारच मोठे नुकसान झालेले आहे.त्यामुळे तब्बल २० लाख कामगार आणि पर्यायाने क...

डोंबिवली मध्ये " एक धाव कोविड "; शिवसेना मध्यवर्ती शाखेकडून जनजागृती रनचे आयोजन..

इमेज
डोंबिवली: शिवसेना मध्यवर्ती शाखा,डोंबिवली व "रनर्स क्लेन" यांनी  कोविड  ह्या आजारसंबंधी लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी जनजागृती रनचे आयोजन केले होते. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व मोडक यांच्या देखरेखे द्वारे  तसेच Runner's Clan चे अध्यक्ष  लक्ष्मण गुंडप यांच्या नेतृत्वाखाली ही रन सामाजिक अंतराचे भान राखून व सर्व  नियम पाळून यशस्वीपणे पार पाडली . धावक विविध घोषणांचे फलक घेऊन धावत होते. धावकांची वैद्यकीय तपासणी ,धावकांना  मास्क व टी- शर्टचे वाटप , धावकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , बक्षिस समारंभ - सत्कार , स्पर्धा संपल्यावर सर्व धावकांना  नाश्त्याची  सोय ह्या व इतर सर्व बाबींची योग्य काळजी घेतली होती. अत्यंत कमी वेळात ह्या रनचे  आयोजन केल्याबद्दल श्री राजेश मोरे , श्री मोडक , श्री लक्ष्मण गुंडप व त्यांच्या  टिमचे समाजाने अभिनंदन केले व आयोजकांनी सर्व धावपटुंचे आभार मानले.

फाऊंटन टोल नाका येथील रस्त्यांच्या कामाला सुरुवात; खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

इमेज
ठाणे : खासदार राजन विचारे वर्सोवा पुलाची पाहणी करण्याकरीता आले असताना रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून दुरुस्ती व देखभाल व्यवस्थित रित्या होत नसल्याने राजन विचारे यांनी त्या पाहणी दौऱ्यात सदर रस्त्याचे काम आठ-दहा दिवसात मार्गी लावावे असे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या याची दखल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेऊन आज रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून खासदारांनी याची खातरजमा करण्यासाठी पहाणी अधिकारी यांच्यासमवेत केली.   या पाहणी दौऱ्यात टोल नाका ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा ५००  मीटरचा रस्त्याची ३+३लेन वाढविण्याचे काम व रस्त्या कडेने गटार पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे जेणेकरून पावसाळ्यात साठणारे पाण्याचा निचरा होऊ शकेल तसेच महापालिकेने तयार केलेल्या सर्विस रोड खाली तीन पाईपलाईन असल्याने रस्ता उंच झाल्याने सदर रस्त्याची लेवल होत योग्य रीतीने करून त्यावर डांबरीकरण तातडीने करण्यात यावे अशा अधिकाऱ्यांना सूचना खासदार राजन विचारे यांनी दिल्या त्यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे

आमदारांच्या गाडीला अपघात ;दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू

इमेज
आमदार किसन कथोरे हे १३ डिसेंबर रोजी मतदार संघातील पूर्व नियोजित कार्यक्रम आटोपून कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून ६.४५ वाजता अनखर पाडा गोवेली वाहोली मार्गे बदलापूरकडे येत असताना त्यांच्या गाडीला समोरून बाईकने धडक दिली त्यामुळे मोठा अपघात झाला होता . आमदार कथोरे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. उपचारानंतर कथोरे यांना डिस्चार्ज मिळाला आहे.  भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने कल्याण तालुक्यातील दहागावजवळ एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचं नाव अमित नंदकुमार सिंग असं आहे. हा तरुण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होता. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचं नाव सिमरन सिंग असं आहे.हा अपघात इतका भीषण होता की गाडीची एअर बॅगही फुटली. मृत तरुण हा आई-वडिलांचा एकुलता एक होता. त्यामुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहेत

लेखक, दिग्दर्शक एकनाथ देसले यांना 'शिवरक्षक' पुरस्कार प्रदान

इमेज
मुरबाड: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजाशी लढताना वीर मरण आलेले क्रांतिवीर भाई कोतवाल यांच्या १०८ व्या जयंती निमित्त आज वडगाव कोल्हाटी औरंगाबाद  येथे  नाभिक सेवा संघाच्या वतीने क्रांतिवीर भाई कोतवाल यांच्या फोटो चे प्रकाशन शहिद भाई कोतवाल चित्रपटाचे दिग्दर्शक  एकनाथजी देसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी एकनाथजी देसले म्हणाले की अनेक क्रांतिवीर हे इतिहासाच्या पायापर्यंत पोहचले  नाहीत. याला कारणीभूत राजकीय व सामाजिक उदासिनता आहे पण  नाभिक सेवा संघाच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे त्यामुळे क्रांतिवीरांचा इतिहास त्या त्या समाजापर्यंत तरी पोहचत आहे क्रांतिवीरांचा इतिहास १३५ कोटी लोकांपर्यत पोहचवने हिच खरी जयंती निमित्त श्रध्दांजली ठरेल यावेळी नाभिक सेवा संघाच्या वतीने क्रांतिवीर भाई कोतवाल यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जिवंत ठेवणारे ईतिहास संशोधक मुरबाड चे भुमीपूञ   एकनाथजी देसले  यांना शिवरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नाभिक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष  माधव भाले, मराठवाडा अध्यक्ष सेनाजी काळे, मराठवाडा कार्याध्यक्ष विजय...

भिवंडीत युनियन बँक ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी उतरली रस्त्यावर

इमेज
 पदचाऱ्यांशी संवाद साधून सहज उपलब्ध करून देणार सेवा भिवंडी : कोरोना काळात असंख्य उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक घडी विस्कटलेली असताना बँका व बँक अधिकारी कर्मचारी अशा परिस्थितीत ही जनतेला सेवा देऊन आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी झटत होते.त्यांच्या तळमळीतूनच ग्राहकांच्या सेवेकरीता फिट ऑन स्ट्रीट ही योजना सुरु करीत असून यामध्ये बँकेचे विक्री अधिकारी रस्त्यावर उतरून नागरीकांना विविध योजनांची माहिती देणार आहेत अशी माहिती मुंबई विभागीय मुख्य व्यवस्थापक व्यंकटेश मंचाल यांनी सांगितले.ते भिवंडी बँक कार्यालयात फिट व स्ट्रीट या योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी ठाणे विभागीय व्यवस्थापक रेणू नायर ,उपव्यवस्थापक राजकुमार,डी.संदीप ,शाखाधिकारी दीप अमर , मीरा कॉटनचे जयेश शहा ,बॉम्बेवाला ज्वेलर्सचे  प्रदीप राका आदींसह असंख्य ग्राहक उपस्थित होते. कोरोना काळात सर्व घरी बसले असताना बँक कर्मचारी सर्वाना सेवा देत होते.त्यांच्या घरी सुध्दा वयोवृद्ध ,लहान बालक असताना त्यांनी हे काम केले त्यांच्या मनात सुध्दा भीती होती पण सेवा महत्वाची होती ते कर्तव्य आम्ही पार पाडले.मोठे व्यावसायिक ...

कुडूस येथील युनियन बॅक कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या

इमेज
वाडा: कुडूस येथील युनियन बॅक ऑफ इंडिया या शाखेतील कर्मचारी नेनावथ दिलीपकुमार नाईक(२८) यांनी आज दुपारच्या सुमारास भाड्याने राहात असलेल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडूस येथे युनियन बॅक ऑफ इंडिया या बॅकेची शाखा आहे. या शाखेत नेनावथ नाईक हे कर्मचारी म्हणून कार्यरत होते.मैत्री काॅम्प्लेक्स या इमारतीत तो आपल्या सहका-यासह राहात होता. नेनावथ आज बॅकेत कामाला गेला नव्हता सायंकाळी सहकारी कर्मचा-याने दरवाजा उघडला असता त्याला गळफास घेतलेला नेनावथ दिसला.त्याने लगेच पोलिसांना ही माहिती दिली.नेनावथचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता.या घटनेचा तपास कुडूस पोलिस करीत असून रात्री उशीरापर्यंत तपास कार्य सुरूच आहे.

"शेती टिकवण्यासाठी मातीची काळजी आवश्यक" - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने

इमेज
  मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा पार पडली.         बदलापूर: शेती टिकवायची असे तर मातीची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले. कोकणात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक आहे. शेतकरी भातात मुख्यत्वे युरिया चा वापर करतात. इतर अन्न द्रव्यांचा वापर न केल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जमीन सुपीकता निर्देशांक नुसारच जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी सेंद्रिय खताचा व उत्पादन वाढीसाठी  रासायनिक खताचा वापर करावा. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल व जमिनीची प्रत ही सुधारेल असेही अंकुश माने यांनी यावेळी सांगितले. मृदा दिना निमित्त अंबरनाथ तालुक्यातील येवे येथे आयोजित केलेल्या शेतकरी कार्यशाळेत  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले. यावेळी येवे गावातील "कृषी वार्ता फलका"चे अनावरण करण्यात आले.   "एक गाव एक संदेश" या उपक्रमांतर्गत गावातल्या प्रत्येक घरातील फोन नंबर घेवून ब्रॉड कास्ट लिस्ट च्या मध्यामतून कृषी संदेश गावातील प्रत्येक घरात पोहचविण्याचा कृ...

दोन भावंडांसह तिघांनी पाच दुचाक्या पेटवल्या; बसण्यावरून हटकल्याच्या रागातून कृत्य

इमेज
दोघांना अटक;एकाची बालसुधारगृहात रवानगी..  उल्हासनगर: बिल्डिंगच्या बाहेर बसण्यावरून हटकल्याने व त्याची तक्रार घरी केल्याने संतप्त झालेल्या दोन भावंडांसह अल्पवयीन मुलाने पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या ५ दुचाक्या पेटवल्या आहेत. शनिवारी रात्री ही घटना उल्हासनगरात घडली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी भावंडांना अटक केली असून अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.  कॅम्प नंबर ३ मधील २२ सेक्शन परिसरात प्रेम सागर बिल्डिंग आहे.बिल्डिंगच्या गेटसमोर तिघेजण रिक्षात बसून दारू पीत असल्याचा संशय एका रहिवाशाला आला.त्याने त्यांना बसण्यावरून हटकले.पुन्हा ते आल्यावर रहिवाशाने त्यांच्या पालकांकडे तक्रार केली होती.याचा राग आल्याने तक्रारदाराची दुचाकी त्यांनी पेटवली.मात्र बाजूलाच आणखीन चार गाड्या उभ्या असल्याने त्याही जळून खाक झाल्या.रहिवाशांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.पण तो निष्फळ ठरला. दुचाक्यांना पेटवण्यात आल्याचा हा व्हिडीओ मासमीडियावर व्हायरल झाल्यावर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते,सहायक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे...

सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढायचे आणि धनदांडग्याना वाटायचे हा केंद्र सरकारचा उद्योग

इमेज
आमदार विश्वनाथ भोईर यांची केंद्र सरकारवर टीका   कल्याण : सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढायचे आणि धनदांडग्याना वाटायचे हा केंद्र सरकारचा उद्योग असल्याची टीका कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केंद्र सरकारवर केली आहे. सातत्याने होणारी  पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने केली. कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारि नगरसेवकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.  यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अपशब्द काढणार्या भाजप खासदार रावसाहेब दानवे विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.आमदार विश्वनाथ भोईर यांनी अच्छे दिन चे स्वप्न दाखवत सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढायचे आणि धनदांडग्याना वाटायचे असा केंद्र सरकारचा उद्योग सुरू आहे. सातत्याने इंधन दरवाढ करत सर्वसामान्यांना लुबाडले जात आहे. रावसाहेब दानवे कायम शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतात हे चुकीचे असून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज धरणे आंदोलन केल्याचे आमद...

उल्हासनगरातील अवैध धंद्यांवर ४८ तासात धडक कारवाई,

इमेज
पोलीस उपायुक्तांचे भाजपाला आश्वासन उल्हासनगर : येणाऱ्या ४८ तासात उल्हासनगरातील सर्व अवैध धंद्यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असे आश्वासन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.शहरात चरस,गांजा,अफीम आदी अमली पदार्थ,मटका,जुगार,क्रिकेट बेटिंग,देहव्यापार,हुक्कापार्लर आदी अवैध धंदे कोणकोणत्या ठिकाणी सुरू आहेत त्या स्पॉटची माहिती भाजपाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे सोपवली आहे.त्यात ऑर्केस्ट्रा बारला रात्री साडे अकरा पर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे.मात्र हे बार राजरोसपणे मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत सुरू राहत असून या बारची नावे निवेदनात नमूद करण्यात आली आहेत. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेण्यात आलेल्या शिष्टमंडळात आमदार कुमार आयलानी,जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी,विरोधी पक्षनेता किशोर वनवारी,माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया,नगरसेवक-प्रवक्ते मनोज लासी,टोनी सीरवानी,शेरी लुंड,प्रदीप रामचंदानी,गजानन शेळके,माजी नगरसेवक पी.एस.आहूजा यांचा समावेश आहे.४८ तासात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार असे आश्वासन ...

राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रकार्य हीच भाजपा व संघ परिवाराची सर्वोच्च भावना- माजी आमदार नरेंद्र पवार

इमेज
कल्याण : आपला परिवार म्हणजे कौटुंबिक नाही तर हे राष्ट्र म्हणजेच एक परिवार आहे. भाजपाचा कार्यकर्ता हा राष्ट्रकार्याला समर्पित होऊन काम करतो. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरीही राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रकार्य हाच आपला मूळ विचार असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्हा आयोजित कल्याण पूर्व व श्रीमलंग मंडलाचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. दरम्यान आपला विचार परिवार या विषयावर माजी आमदार नरेंद्र पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश हे एक शिस्तबद्ध आणि समर्पित स्वयंसेवकाचे प्रमाण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वव्यापी होऊन केवळ संघ स्वयंसेवक कार्यरत असतो, त्यामध्ये भाजपा राजकीय क्षेत्रात काम करणारा एक घटक आहे. परिवारात व्यक्तिपूजेला थारा नाही, संघाची प्रार्थना ही राष्ट्र उन्नतीची आहे आणि संघाचा गुरू हा भगवा ध्वज आहे. आपणही आपल्या सार्वजनिक जीवनात व्यक्तिपूजेला महत्व न देता राष्ट्रासाठी काम केले पाहिजे. राजकारणात नगरसेवक, आमदार खासदार, मुख्यमंत्री आणि...

पाणी योजना जनतेसाठी उभारा,ठेकेदारासाठी नकोत :आ. किसन कथोरे

इमेज
टिटवाळा : ११  पाणी योजना उभारून ही गावातील माता ,भगिनींना डोक्यावरून पायपीट करत पाणी आणावे  लागते, हे पाप  ठेकदारांचे आहे, पाणी योजना उभारायची आणि बिल घेतले की योजना बंद हे चित्र बदलण्यासाठी महिलांनी सतर्क राहावे, पाणी योजना जनतेसाठी आहे,याचे भान ठेवून ती उभारा केवळ ठेकेदारांच भल करण्यासाठी पाणी योजना उभारू नका असा सज्जड दम आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्याच्या पाणी पुरवठा विभागातर्फे आयोजित जल जीवन कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत प्रशासनास दिला , यावेळी सभापती अनिता वाघचौरे, उपसभापती रमेश बांगर,भाजपचे तालुका अध्यक्ष चंदू बोष्टे, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री सासे, पंचायत समितीच्या सदस्य यशवंत दळवी, सौ देशमुख , दर्शना जाधव,रेश्मा भोईर, भारती टेंबे, म्हात्रे, ठोंबरे, यांच्यासह गट विकास अधिकारी श्वेता पालवे ,पाणी पुरवठा उप अभियंता श्री कांबळे ,श्री गहाणे , राजाराम चौधरी, देविदास चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी प्रत्येक कुटूंबाला स्वच्छ व नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन मिशन सुरू केले आहे, याबाबत माहिती देत आमदार किसन क...

शहापुर तालुक्यात होणार सर्वप्रथम गावठाण मोजणी

इमेज
कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांतून होणार शुभारंभ..             मोजणीसाठी घोगांवणार थेट ड्रोन कॅमेरा     अघई : जमीन मोजणी प्रक्रिया अत्यंत कीचकट असते.त्यासाठी वेळ व मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर वापरावे लागते.त्यामुळे या वर उपाय म्हणून सरकारकडून आधुनिक यंत्राने गावांचे सिमाकंन आणि गावठाण मोजणीचे काम ड्रोन च्या मदतीने होणार आहे.विशेष म्हणजे एका गावाचे गावठाण केवळ एका दिवसात मोजुन पूर्ण होणार आहे.त्यामुळे सरकारी यंत्रणांचा वेळ,खर्च बचत होण्यास मदत होणार आहे.  ग्रामपंचायती च्या मालकी हक्कात येणाऱ्या गावठाण जमिनीची मोजणी करून त्या जागेवर वर्षानुवर्ष वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना मालकी हक्क देवुन प्रॉपर्टी कार्ड देण्याची तयारी सरकार कडुन सुरू झाली आहे.त्याची तयारी कोकण विभागातील ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातुन होणार आहे.  आदिवासी रहिवाशांनी या योजनेचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. जानेवारी महिन्यात शहापूर तालुक्यात ड्रोन मोजणीला सुरवात केली जाणार असून,गावठाण जागेत राहाणाऱ्या कुटुंबाची नोंद घेवुन भूमि अभिलेख कार्...

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी: एकनाथ शिंदे

इमेज
ठाणे : सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात आली असून सामान्य माणसाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे हा ध्यास यामागे आहे. नियम चांगले असले तरी त्याची अंमलबजावणीही तितक्याच काटेकोर आणि प्रभावीपणे झाली पाहिजे असं प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्य शासनानं मंजूर केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली संदर्भात एका तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही नियमावली समजून घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.  दीडशे चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडावर स्व वापरासाठी घर बांधणा-या व्यक्तीला बांधकाम परवान्याची आवश्यकता यामध्ये रद्द करण्यात आली आहे. हौसिंग स्टॉक वाढत असतानाच नगर नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. ही नियमावली म्हणजे बांधकामासाठीची नियमावली नसून शहराच्या शिस्तबध्द विकासाच्या नियोजनाचे ते महत्वपूर्ण साधन आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र निय...

उल्हासनगरातील मोटरसायकल चोरीचे कनेक्शन जुन्नर मध्ये...

इमेज
दोन सराईत चोरांकडून १०मोटरसायकली ताब्यात,मध्यवर्ती पोलिसांची कामगिरी    उल्हासनगर : उल्हासनगरातून चोरलेली मोटरसायकल ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये विकली.या कनेक्शन वरून मध्यवर्ती पोलिसांनी दोन सराईत चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून १०मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.पोलिसांना या कामगिरीची शाबासकी देणारे नवनियुक्त पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी सहायक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर,पोलीस निरीक्षक(गुन्हे)राजेंद्र कोते, सहायक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब उपस्थित होते. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी झालेली एक युनिकोर्न मोटारसायकल ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे विकण्यात आल्याची माहिती बातमीदाराकरवी सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी मूळ जुन्नरचा असणाऱ्या व उल्हासनगरातील शांतीनगरात राहणाऱ्या महादू आढारी याला अटक केली.धिरज शिंदे व आणखीन एकासोबत मोटरसायकली चोरी केल्याची कबुली महादूने दिल्यावर पोलिसांनी संजयला देखील अटक करण्यात आली. आरोपींनी अंबरना...

पाच्छापुर जंगलात आईसह तीन मुंलाचे झाडाला लटकलेले मृतदेह आढळल्याने खळबळ

इमेज
पडघा : भिंवडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाच्छापुर येथील जंगलात झाडाला लटकलेले आईसह तीन मुंलाचे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.तर पत्नी आणी मुंलाचे मृतदेह बघुन वडीलांनीही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   श्रीपत बच्चु बंगारे रा उंबरखांड पाच्छापुर असे विष प्राशन करणाऱ्या ईसमाचे नाव असुन पत्नी रंजना (३०) मुलगी दर्शना (१२) रोहीणी (६) रोहीत (९)अशी जंगलात झाडाला लटकलेल्या आढळून आलेल्या मृतदेहाचीं नावे असुन हे चौघेही बेपत्ता असल्याची तक्रार श्रीपत याने २१ ऑक्टोबर रोजी पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुरुवार दिंनाक १० डीसेंबर रोजी श्रीपत याचा भाऊ व पत्नी गण्या डोंगर आवळ्याची वाडी पाच्छापुर येथील जंगलात लांकडे आणायला गेले असता एका झाडाला लटकलेले दुर्गंधी सुटलेले या चौघांचे मृतदेह आढळून आले.  कपड्यावरून ओळख पटल्याने यांची माहिती त्याने श्रीपत यास दिली सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी व पडघा पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थ...

मार्ग दाखविणारे फलक झाली दिशाभूल करणारे...

इमेज
वाहन चालकाची दिशाभूल  रस्त्यावरील फलकांची दुरवस्था  कसारा: खोडाळा ते विहीगाव  रस्त्यावर अंतर व दिशा यांची माहिती होण्याच्या दृष्टीने लावण्यात आलेले फलक दिशाहीन  झाले आहेत.  रंग उडालेला  दिसतात आहे . त्यामुळे बाहेरून रहदारी करणाऱ्या वाहनचालकांच्या अडचणीत भर पडत आहे. या मार्गावर नवीन फलक बसविण्यात यावी अशी मागणी वाहनचालक कडून होत आहे  प्रमुख मार्गावरील दिशादर्शक व गावाचे अंतर दाखवणाऱ्या फलकाचे अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर कोणते गाव ते किती अंतर कोणते गाव कोणत्या दिशेला आहे हे कळत नसल्याने सावळा गोंधळ उडत आहे.  याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग करीत नसल्याचे दिसून येत जंगलव्याप्त भागात असलेल्या गावातील मार्गावरील दिशादर्शक फलक ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे व गवत  वाढल्याने   दिसत नाही. वळणमार्ग एकेरी या बाबतची माहीती येणार्या व दिशा दर्शवणाऱ्या फलकांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बहुतांश फलकावरील रंग उडुन गेला असुन नुसत्या मोडकळीस आलेल्या पाटया लटकलेल्या दिसतात.

टेंभवली गावात जबरी दरोडा ; 3 किलो सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांची रोकड लंपास

इमेज
भिवंडी : तालुक्यातील मौजे टेंभवली गावातील एका वीटभट्टी उद्योजकाच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचे ३ किलो वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड कपाट फोडून चोरून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिपक परशुराम बाबरे असे घरफोडी झालेल्या वीटभट्टी उद्योजकाचे नांव आहे. सदर कुटुंबीय घराच्या प्रवेशद्वाराला व घराला कुलूप लावून मुलीला सासरी पनवेल येथे सोडण्यासाठी गेले होते. ते सायंकाळी घरी आल्यानंतर गेटच्या व घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसल्याने घरातील लाकडी कपाट तपासून बघितले असता कपाटाचे कुलूप देखील फोडलेले आढळून आले.त्यामुळे कपाटाची तपासणी केली असता कपाटातील ३ किलो सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.  या दरोड्याच्या घटनेची माहिती तात्काळ तालुका पोलीस ठाण्यास दिली असता वपोनी.राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिराने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

आजोबा पर्वतावरील विजेचा प्रश्न सोडविण्याची आमदार किसन कथोरें कडे मागणी

इमेज
  मुरबाड : शहापुर  तालुक्यात असणारे रामायण कालीन तिर्थस्थळ आजोबा पर्वत  हा अजूनही सोयीसुविधे पासून वंचित राहिला आहे. या ठिकाणी रामायण ग्रंथाचे रचनाकार महर्षी वाल्मिक रुषी यांची समाधी आहे परंतु आजही इथे येणाऱ्या भक्त व पर्यटकांना सोयी उपलब्ध नाहीत.  यासाठी मुरबाड येथे टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथ बाबा यांनी मुरबाड विधानसभा मतदार संघांचे  आमदार  किसनजी कथोरे  यांची भेट घेऊन गेली अनेक  वर्षा पासून प्रलंबित असलेल्या  वाल्मिक रुषींचा आश्रम आजोबा पर्वताचा वीज पुरवठा सूरु करण्यासाठी प्रयत्न करावा व हा  प्रश्न तात्काळ मार्गी लावावा या साठी व इतर विषयावर चर्चा केली. आमदार कथोरे साहेबांनी योगी फुलनाथ बाबांच्या सर्व समस्या ऐकून त्या  १००% सोडवणार असल्याची व आजोबा पर्वताचा विजेचा प्रश्न  लवकरात लवकर सुटण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही  यावेळी आमदार महोदयांनी दिली.

डोंबिवलीत भोपाळसारखी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का ... -आमदार राजू पाटील

इमेज
कल्याण : डोंबिवलीमध्ये जोपर्यंत भोपाळ सारखी मोठी दुर्घटना घडणार नाही , तोपर्यंत प्रंशासनाला जाग येणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया कल्याण ग्रामीणचेआमदार राजू पाटील यांनी दिली आहे . डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीच्या घटनास्थळी आमदार राजू पाटील यांनी भेट दिली. डोंबिवलीजवळील सोनारपाडा गावात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली . डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात सतत आग लागण्याच्या घटना घडत आहेत . वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे अजिबात लक्ष देत नाही . त्यामुळे डोंबिवलीमध्ये भोपाळसारखी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जाग होणार का ? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे .

महिन्याभरात होणार पाच हजार बेवारस वाहनांचा लिलाव...

इमेज
ठाणे : रस्ते अडवून अनेक दिवस ठाण मांडलेल्या बेवारस वाहनांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली कारवाई आता तीव्र झाली आहे. गेल्या पंधरवड्यात १३६९ बेवारस वाहनांना नोटिस बजावल्यानंतर जवळपास ९४५ मालकांनी आपली वाहने हटवली आहेत. उर्वरित वाहनांच्या लिलावासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू झाली आहे. या वाहनांसह शहरांतील मोकळे भूखंड व्यापलेल्या तब्बल पाच हजार बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतल्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या वाहनांना ये-जा करण्यासाठी रस्ते अपुरे पडू लागले आहेत. अशातच या रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने अनेक महिन्यांपासून धूळ खात उभी दिसतात. वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच दरवर्षी पावसाळ्यात रोगराईला निमंत्रण देणारी ही वाहने हटविण्याची मोहिम ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने सुरू केल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. यामुळे ठाणे शहरांतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत १३८७ वाहने बेवारस स्थित...

ठाण्यात ८५ लाख ४८ हजार बनावट नोटा पोलिसांकडून जप्त.

इमेज
ठाणे : भारतीय चलनातील दोन हजारांच्या दर्शनी मूल्य असलेल्या बनावट चलनी नोटांच्या विक्रीसाठी आलेल्या सचिन आगरे (२९) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. या त्रिकुटाकडून ८५ लाख ४८ हजारांच्या बनावट नोटाही हस्तगत करण्यात आल्या आहेत. कापूरबावडी सर्कल येथील टीएमटीच्या बस थांब्यासमोरील रस्त्यावर एक व्यक्ती भारतीय चलनातील दोन हजारांच्या बनावट नोटा चलनामध्ये वटविण्यासाठी येणार असल्याची 'टीप' वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे, जमादार बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे आणि देविदास जाधव आदींच्या पथकाने आगरे याला सापळा रचून ९ डिसेंबर रोजी कापूरबावडी सर्कल येथून रंगेहाथ अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये आणखी दोघांची नावे यात समोर आली.  त्यानंतर मन्सुर खान (४५) आणि चंद्रका...

मुरबाड शहराची बाजारपेठ शुक्रवारी सुरु करण्याची मागणी;दुकानदार व फूटपाथ व्यवसायीकांचे होतेय नुकसान

इमेज
  मुरबाड : संपूर्ण मुरबाड तालुक्यात गेल्या नोव्हेंबर पासून कोरोनाचे होणारे संक्रमण हे शुन्यावर आलेले असल्याने  इतर दिवशी शहरात नागरिकांची बाजारपेठेत तसेच शासकीय कार्यालयात मोठ्या  प्रमाणात वर्दळ असताना मुरबाड नगरपंचायत जाणीवपूर्वक दर शुक्रवारी मुरबाड शहरात भरणारा आठवडी बाजार बंद करुन संपूर्ण शहर बंद ठेवत असल्याने फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांची उपासमार होत असुन नगरपंचायतच्या  कारभारामुळे नागरिकांमधे संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या मार्च पासून कोरोना कोविड १९ या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणुन शासनू सर्वत्र सुरु केलेले लाॅकडाऊन हे सप्टेंबर पासुन शिथिल केले असल्याने संपूर्ण शहरातील बाजारपेठा या खुल्या करण्यात आलेल्या आहेत.तर काही ठिकाणी सुरु असलेले आठवडी बाजार देखील भरत असताना मुरबाड तालुक्यातील शहरी औद्योगिक तसेच ग्रामिण भागात नोव्हेंबर पासून कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळल्याचे  मोठ्या प्रमाणात  घट झालेली असताना एक प्रकारे तालुका कोरोना मुक्त झालेला असल्यामुळे हातावर पोट भरणारा चाकरमानी हा आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडत आहे.त्यामुळे फुटपाथवर भाजीपाला किंवा ...