टेंभवली गावात जबरी दरोडा ; 3 किलो सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांची रोकड लंपास


भिवंडी : तालुक्यातील मौजे टेंभवली गावातील एका वीटभट्टी उद्योजकाच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचे ३ किलो वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड कपाट फोडून चोरून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिपक परशुराम बाबरे असे घरफोडी झालेल्या वीटभट्टी उद्योजकाचे नांव आहे.

सदर कुटुंबीय घराच्या प्रवेशद्वाराला व घराला कुलूप लावून मुलीला सासरी पनवेल येथे सोडण्यासाठी गेले होते. ते सायंकाळी घरी आल्यानंतर गेटच्या व घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसल्याने घरातील लाकडी कपाट तपासून बघितले असता कपाटाचे कुलूप देखील फोडलेले आढळून आले.त्यामुळे कपाटाची तपासणी केली असता कपाटातील ३ किलो सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.

 या दरोड्याच्या घटनेची माहिती तात्काळ तालुका पोलीस ठाण्यास दिली असता वपोनी.राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिराने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...