सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढायचे आणि धनदांडग्याना वाटायचे हा केंद्र सरकारचा उद्योग

आमदार विश्वनाथ भोईर यांची केंद्र सरकारवर टीका  

कल्याण : सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढायचे आणि धनदांडग्याना वाटायचे हा केंद्र सरकारचा उद्योग असल्याची टीका कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केंद्र सरकारवर केली आहे. सातत्याने होणारी  पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने केली. कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारि नगरसेवकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. 

यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अपशब्द काढणार्या भाजप खासदार रावसाहेब दानवे विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.आमदार विश्वनाथ भोईर यांनी अच्छे दिन चे स्वप्न दाखवत सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढायचे आणि धनदांडग्याना वाटायचे असा केंद्र सरकारचा उद्योग सुरू आहे. सातत्याने इंधन दरवाढ करत सर्वसामान्यांना लुबाडले जात आहे. रावसाहेब दानवे कायम शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतात हे चुकीचे असून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज धरणे आंदोलन केल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...