मार्ग दाखविणारे फलक झाली दिशाभूल करणारे...
वाहन चालकाची दिशाभूल रस्त्यावरील फलकांची दुरवस्था
कसारा: खोडाळा ते विहीगाव रस्त्यावर अंतर व दिशा यांची माहिती होण्याच्या दृष्टीने लावण्यात आलेले फलक दिशाहीन झाले आहेत. रंग उडालेला दिसतात आहे . त्यामुळे बाहेरून रहदारी करणाऱ्या वाहनचालकांच्या अडचणीत भर पडत आहे. या मार्गावर नवीन फलक बसविण्यात यावी अशी मागणी वाहनचालक कडून होत आहे प्रमुख मार्गावरील दिशादर्शक व गावाचे अंतर दाखवणाऱ्या फलकाचे अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर कोणते गाव ते किती अंतर कोणते गाव कोणत्या दिशेला आहे हे कळत नसल्याने सावळा गोंधळ उडत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग करीत नसल्याचे दिसून येत जंगलव्याप्त भागात असलेल्या गावातील मार्गावरील दिशादर्शक फलक ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे व गवत वाढल्याने दिसत नाही. वळणमार्ग एकेरी या बाबतची माहीती येणार्या व दिशा दर्शवणाऱ्या फलकांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बहुतांश फलकावरील रंग उडुन गेला असुन नुसत्या मोडकळीस आलेल्या पाटया लटकलेल्या दिसतात.