"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा


मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीस बोलत होते. काही निवडणुकांमध्ये इकडे तिकडे झाले म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे, जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी निवडणुकीत सोबत यावे (त्यांनी एकत्र निवडणूक लढवावी) ही तर आमची इच्छा आहे.ते सोबत आल्यामुळे त्यांना स्पेस उरणार नाही. एखाद्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तर चिंता करायचे कारण नाही. या तिन्ही पक्षाने आपल्या संधी दिली आहे जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू.

भाजपचे आमदार आमच्याकडे येणार अशा वावड्या ते उठवत राहतात. पण कुणीही जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात. या देशाचा वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदी आहेत, हे आमच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. सर्व निवडणुका आम्ही जिंकत आहोत. येत्या काळात लोक आपल्याकडे येणार आहेत. त्यांना चांगली जबादारी आपण देणार आहोत. परिवारामध्ये छोटा वाद होतो, पण परत ते एकत्र येतात. बाळासाहेब सानप आपल्यासोबत आले आहेत", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

भिवंडीतील खासगी कर वसुलीचा ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन